खनिजसंपत्ती व उर्जा साधने
खनिज म्हणजे असेंद्रिय निश्चित स्वरूपाची संघटना असलेला एकजिनसी पदार्थ
भूकवचात विविध प्रकारचे खडक आढळतात. खनिजे ही खडकामध्ये आढळतात, परंतु विशिष्ट प्रकारची खनिजे विशिष्ट प्रकारच्या खडकातच सापडतात.
उदा.- १) अग्निजन्य खडक - अग्निजन्य खडकात मॅगनीज, लोह, तांबे, शिसे, सोने यांसारखी खनिजे आढळतात.
२) स्तरीत खडक - स्तरीत खडकात दगडी कोळसा, खनिज तेल, जिप्सम, मीठ यांसारखी खनिजे आढळतात.
३) रूपांतरित खडक - रूपांतरित खडकात अभ्रक, टोपॅझ, गार्नेडसारखी खनिजे आढळतात.
सह्याद्रीपासून पूर्वेकडे लाव्हारसाच्या थरावर थरांचे संचयन झाले. हे संचयन सह्याद्री व पठारी भागात झाले, त्यामुळे या बेसाल्ट खडक थराच्या भागात महाराष्ट्रात खनिजे नाहीत. महाराष्ट्राच्या पूर्व भागात मात्र लाव्हारसाचे हे थरांचे संचयन पोहोचले नाही, त्यामुळे गोंडवाना काळातील प्राचीन रूपांतरित स्फटिकी खडक नागपूर परिसरात भूपृष्ठाजवळ आढळतात. त्यातून लोह, कोळसा, चुनखडी, मँगनीज इ. खनिजे उपलब्ध होतात.
- पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ व कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड तसेच महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती एकवटलेली आहे.
मँगनीज (मंगल)
- मँगनीज पृथ्वीवर शुद्ध धातूच्या स्वरूपात आढळत नसून मँगनीज ऑक्साईड कार्बोनेट आणि सिलिकेटच्या स्वरूपात मिळते.
- भूकवचात मॅगनीजचे प्रमाण ०.१० टक्क्यापेक्षा कमी आढळते.
- मँगनीजची सायलोमिलेन, ब्राऊनाईट, पायरोल्यूसाईट व मॅग्नेटाईट अशी चार खनिजे आढळतात.
- मँगनीज धातू शेंदरी काळ्या रंगाचा असतो.
- मँगनीज व लोहाच्या एकत्रीकरणास फेरोमँगनीज म्हणतात.
- भारतातील एकूण मँगनीज साठ्यापैकी ४० टक्के साठा महाराष्ट्रात असून देशातील मॅगनीजच्या एकूण उत्पादनापैकी २४ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- मध्यप्रदेशचा मँगनीज उत्पादनात प्रथम क्रमांक असून महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.
- महाराष्ट्रात मॅगनीज खनिजाचे साठे कॅब्रियन पूर्व कालखंडातील स्तरित खडकापासून रूपांतरित झालेल्या खडकात आढळतात.
- महाराष्ट्राच्या पूर्व भागात नागपूर व भंडारा जिल्ह्यात व दक्षिण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मँगनीज सापडते.
- मँगनीजचे सर्वाधिक साठे भंडारा जिल्ह्यात आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभ्या खडकात वायुपाषाण स्वरूपात सापडणारा मँगनीज हलक्या प्रतीचा आहे.
- सातारा जिल्ह्यात जांभ्या खडकात कमी प्रतीचे मँगनीज सापडते.
- नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खापापासून ते मध्यप्रदेशातील बालाघाटपर्यंत मॅगनीज पट्टा असून याची रुंदी २५ किमी आहे.
- नागपूर, भंडारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॅगनीज खनिजाचे उत्पादन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
- भंडारा, नागपूर जिल्ह्यातील मॅगनीज साठे भूपृष्ठालगत असल्यामुळे ते खोदून काढणे सोपे आहे.
- मँगनीज या खनिजाचे उत्पादन उघड्या खाणीतून मानवी श्रमशक्तीच्या साहाय्याने केले जाते.
- नागपूरजवळील कन्हान आणि भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे मँगनीज (फेरो मँगनीज) शुद्ध करण्याचे कारखाने आहेत.
- निम्न प्रतीचे मँगनीज खनिज हे भिलाई पोलाद कारखान्यात वापरले जाते.
- नागपूर व भंडारा जिल्ह्यात मॅगनीज साठे प्रामुख्याने आर्कियन कालखंडातील सौसार व साकोली या धारवाड श्रेणीच्या प्रस्तर समुहात आढळतात. क्वार्टझाईट, शीस्ट, नीस व गोंडाईट प्रकारच्या खडकात हे साठे असून या खनिजात मॅगनीजचे प्रमाण ४० ते ४५ टक्के आहे.
- महाराष्ट्रात मॅगनीज उत्पादनापैकी फक्त १५ टक्के मँगनीज कन्हान (नागपूर) व तुमसर (भंडारा) येथील शुद्धीकरण कारखान्यात वापरले जाते. अन्य मँगनीज इतर राज्यात तसेच परदेशात निर्यात केले जाते.
- मँगनीज खनिजाचे ९५ टक्के उत्पादन लोह-पोलाद उत्पादनात वापरतात.
- मँगनीजचे उपयोग
- उच्च दर्जाचे पोलाद, रंगनिर्मितीसाठी, शिशाच्या भांड्यांना मुलामा, लोखंडाच्या शुद्धीकरणात, रसायने, प्लॉस्टिक, पिग आयर्न, कीटकनाशक, ब्लिचिंग पावडर, चिनीमातीची भांडी, काचेच्या वस्तू बनविण्यासाठी, कोरड्या बॅटरी, दागिण्यांना डाग देण्यासाठी, कापड उद्योग, फोटोग्राफी, रेल्वेरुळ,काडेपेटी उद्योग, तिजोऱ्या निर्मितीत. काचेवर रंग देण्यासाठी वापरतात.
- महाराष्ट्रातील प्रमुख मँगनीज क्षेत्रे पुढीलप्रमाणे
- नागपूर जिल्हा
- खापा, मनसळ, कांद्री, कोदेगाव, रामडोंगरी, गुमगाव, पारशिवनी या सर्व भागात उच्च दर्जाचे मँगनीज सापडते. सावनेर - रामटेक हा वैशिष्ट्यपूर्ण मँगनीजचा पट्टा आहे.
- भंडारा जिल्हा
- भंडारा जिल्ह्यात डोंगराळ भागात मॅगनीज सापडते.
- भंडारा जिल्ह्यातील मॅगनीज साठे गोंडाइटमालेच्या खडकाशी निगडित असून त्यामध्ये सिलोमिलोन हे, मुख्य खनिज सापडते.
- डोंगरी बुद्रुक, लोहडोंगरी, बेलडोंगरी, सीतासावंगी, चिखला, मांद्री, कोडेगाव, कुरमुडा, पाल, बुझरु सातक, गोकुलडोह इ. ठिकाणी मँगनीज आढळते.
- सिंधुदुर्ग जिल्हा
- सावंतवाडी तालुक्यात डिंगणे,नेतडे,सासोली, बांदा व कणकवली तालुक्यात फोंडा येथे मँगनीज आढळते
- सन २०१०-११ मध्ये महाराष्ट्रात् ७४३ हजार मे.टन मॅगनीजचे उत्पादन झाले.
- या जिल्ह्यातील धातूपाषाण हा हलक्या श्रेणीचा सून देगवे,आडाळी,कालपो जवळ आढळतो.
- भारतात मॅगनीजचा साठा १६१ दशलक्ष टन आहे.
बॉक्साईट
- अॅल्युमिनिअम ऑक्साईड आणि हैड्रोजन यांचे मिश्रण म्हणजे बॉक्साईट होय.
- अतिपर्जन्य, उष्ण व दमट हवामान असणाऱ्या जांभ्या खडकात बॉक्साईटचे साठे आढळतात.
- बॉक्साईट खनिजापासून अॅल्युमिनिअम खनिज मिळते.
- अॅल्युमिनिअम हे हलके असून उत्तम विद्युतवाहक आहे.
- विद्युत उपकरणे, विजेच्या तारा बनविणे, भांडी, यंत्रसाम्रगी, विमाने, वाहनांचे सुटे भाग तयार करण्यासाठी अॅल्युमिनिअमचा उपयोग होतो.
- देशातील बॉक्साईटच्या एकूण साठ्यापैकी ४ टक्के साठा महाराष्ट्रात आहे.
- बॉक्साईटच्या एकूण उत्पादनाच्या ८० टक्के बॉक्साईट अॅल्युमिनिअम निर्मितीसाठी वापरले जाते. तर २० टक्के बॉक्साईट लोह-पोलाद व सिमेंट उत्पादनात वापरतात.
- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २१ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगराळ भागात सापडणारे बॉक्साईट उच्च प्रतीचे असून त्यात ५० टक्के अॅल्युमिनिअमचा अंश आहे.
- महाराष्ट्रात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बॉक्साइटचे साठे आढळतात.
- बॉक्साईटला पर्यायी धातू म्हणून आर्थोसाईट हा धातू उपयोगात आणला जातो.
- महाराष्ट्रात बॉक्साईटचे सुमारे ६८ दशलक्ष साठे असून ते उच्च प्रतीचे आहेत.
- महाराष्ट्रात २०११ साली बॉक्साईटचे १८५० हजार मेट्रिक टन उत्पादन झाले.
- महाराष्ट्रातील बॉक्साईट साठ्याचे वितरण पुढीलप्रमाणे.
- कोल्हापूर जिल्हा - शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, गारगोटी, चंदगड तालुक्यात बॉक्साईट साठे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट चांगल्या प्रतीचे आहे.
- कोल्हापूर जिल्हा ठिकाणे - (वाकी,रांगेवाडी,उदगिरी,धनगरवाडी,मोगलवाड,भानबेट,नागरतासवाडी)
- कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट हे इंडियन अॅल्युमिनिअम कंपनीच्या बेळगाव येथील अॅल्युमिनिअम कारखान्यात धातूनिर्मितीकरिता उपयोगात आणले जाते.
- २) सिंधुदुर्ग जिल्हा - आंबोली घाटाच्या परिसरात बॉक्साईट साठे आहेत.
- ३) रत्नागिरी जिल्हा - आंबा घाटाच्या पायथ्याशी दापोली व मंडणगड तालुक्यात बॉक्साईट साठे आहेत.
- रत्नागिरी जिल्ह्यातील बॉक्साईट साठे किनारपट्टीपासून जवळ असल्याने उत्खनन सोयीचे होते. 25 दशलक्ष टन.
- ४) सातारा जिल्हा - महाबळेश्वर, पाटण, कृष्णा व कोयना नद्यांच्या खोऱ्याच्या वरच्या टप्प्यात बॉक्साईट साठे आहेत.सातारा जिल्ह्यात बॉक्साईटचे अल्पसाठे असून ते हलक्या प्रतीचे आहेत.
- ५) सांगली जिल्हा - शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात बॉक्साईट साठे आहेत. सांगली जिल्ह्यातील बॉक्साईट साठे कमी प्रतीचे आहेत.
- ६) रायगड जिल्हा रोहा, श्रीवर्धन, मुरूड, महाड तालुक्यात बॉक्साईट साठे आढळतात .रायगड जिल्ह्यातील काही बॉक्साईट निर्यात केले जाते.
- ७) पालघर जिल्हा - वसई तालुक्यात तुंगार टेकड्याच्या ठिकाणी बॉक्साईट सापडते. येथील बॉक्साइट साधारण दर्जाचे आहे. सालसेट बेट.अंदाजित साठे १.३ दशलक्ष टन.
- ८) मुंबई उपनगर - जोगेश्वरी, बोरिवली, गोरेगाव भागात बॉक्साईट साठे सापडतात.
- महाराष्ट्रातील बॉक्साईट रत्नागिरी व बेळगाव या ठिकाणी असलेल्या अॅल्युमिनिअमच्या कारखान्यात वापरले जाते.
- रायगड जिल्ह्यात बॉक्साइटचे साठे सुमारे १० दशलक्ष टन आहेत.येथील बॉक्साईट हे रासायनिक व धात्विक प्रतीचे असण त्यात अॅल्युमिनिअमचे प्रमाण ४५ ते ५२ टक्के आहे.रायगड जिल्ह्यातील काही बॉक्साईट हे निर्यात केले जाते.
लोह-खनिज
- जगात सर्व धातूच्या साठ्यामध्ये लोहाच्या साठ्याचे प्रमाण अधिक आहे. सर्व धातुमध्ये लोह हा धातु स्वस्त असून त्यामध्ये दृढता, लवचिकपणा, कठोरता, चिरस्थायित्व इ. गुणधर्म आढळतात.
- लोहखनिज हे अशुद्ध स्वरूपात सापडते त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते.
- लोहखनिजातील शुद्ध लोहाच्या प्रमाणावरून लोखंड खनिजाचे मुख्य चार प्रकार पडतात.
- १) मॅग्नेटाईट २) हेमेटाईट ३) लिमोनाईट ४) सिडेराईट
- १) मॅग्नेटाईट
- मॅग्नेटाईट खनिज काळ्या रंगाचे असते.
- मॅग्नेटाईट हे अग्निजन्य व रूपातंरित खडकात सापडते.
- मॅग्नेटाईट हे खनिज सर्वात उच्च दर्जाचे लोहखनिज आहे.
- मॅग्नेटाईट खनिजात लोहाचे सर्वात जास्त ७२ टक्के प्रमाण असते.
- मॅग्नेटाईट या खनिजात ओलसरपणाचे प्रमाण अत्यंत कमी (३%) असते.
- मॅग्नेटाईट खनिजाचे मिश्रण प्राणवायूबरोबर असते, यामुळे आणि ओलावा कमी असल्यामुळे मॅग्नेटाईट खनिजाचे शुद्धीकरण सोपे, सहजपणे करता येते.
- २) हेमेटाईट
- हेमेटाईट लोहखनिजाचा रंग तांबडा किंवा भुरकट लाल किंवा तांबूस असतो.
- हेमेटाईटमध्ये लोहाचे प्रमाण ७० टक्के असते, तर ओलावा १० टक्क्यापर्यंत असतो.
- हेमेटाईट हे अग्निजन्य व स्तरित खडकात सापडते.
- हेमेटाईट लोहखनिज सहजपणे स्वच्छ करता येते.
- हेमेटाईट खनिजद्रव्यात इतर खनिजद्रव्ये मिसळलेली असतात.
- ३) लिमोनाईट
- लिमोनाईट हे लोहखनिज तपकिरी रंगाचे असते.
- लिमोनाईट हे लोहखनिज स्तरित खडकात सापडते.
- लिमोनाईट हे मध्यम दर्जाचे लोहखनिज आहे.
- लिमोनाईट खनिजात लोहाचे प्रमाण ६० टक्के असते.
- लिमोनाईट लोहखनिजात ओलसरपणा अधिक असतो. (११%)
- ४) सिडेराईट
- सिडेराईट हे खनिज लोह व कार्बन यांच्या संयोगातून बनते.
- सिडेराईट हे लोहखनिज स्तरित खडकात सापडते.
- सिडेराईट लोहखनिजाचा रंग पिवळा व पिंगट असतो.
- सिडेराईट या खनिजात लोहाचे प्रमाण ४८ टक्के असते.
- सिडेराईट हे कमी दर्जाचे लोहखनिज आहे.
- सिडेराईट खनिजात ओलाव्याचे प्रमाण ७ टक्क्यापर्यंत असते.
- सिडेराईट खनिजात अनेक अशुद्ध द्रव्ये आढळतात.
- लोहखनिजाचे वितरण
- भारतातील एकूण लोहखनिज साठ्यापैकी महाराष्ट्रात २० टक्के साठा आहे.
- महाराष्ट्रातील लोहखनिज उत्तम प्रतीचे असून येथील लोहखनिजात ५० टक्के लोहांश असतो.
- महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण भागात लोहखनिज सापडते.
- चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये टॅकोनाईट आणि रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात जांभा खडकात लोहखनिज आढळते.
- उत्तम प्रकारचे लोहखनिज हे धारवाड संघाच्या खडकाशी निगडीत असते.यामधील हेमेटाईट हे महत्त्वाचे खनिज आहे.ते उघड्या खाणीतून काढले जाते.
- भारतात लोहखनिजाचा अंदाजे साठा १३४३ कोटी टनांचा आहे.
- १) चंद्रपूर
- महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा खनिजसंपत्तीत सर्वात समृद्ध जिल्हा आहे.
- महाराष्ट्रातील एकूण लोहखनिजापैकी ६० टक्के लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात सापडते.
- चंद्रपूर जिल्ह्यात उच्च दर्जाचे लोहखनिज सापडते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात भिसी व असोला (गुंजेवाही), लोहारा (गुंजेवाडी), पिंपळगाव या भागात मोठ्या प्रमाणात लोहखनिज सापडते. याशिवाय चिमूर, रत्नापूर, भिसी, लोहारडोंगरी (ब्रह्मपुरी तालुका) या भागात लोह खनिज सापडते.
- चंद्रपूर जिल्ह्यात हेमेटाईट व मॅग्नेटाईट अशा दोन्ही प्रकारचे लोहखनिज सापडते.
- चंद्रपूर जिल्ह्यातील लोहखनिज धारवाड श्रेणीच्या क्वार्टझाईट खडकात व त्याहीपेक्षा प्राचीन साठे फेरूजिनस वालुकाश्मात सापडतात.
- चंद्रपूर जिल्ह्यातील लोहखनिजात ६३.६५ टक्के लोहांश आहे.
- सन २०१३ नुसार चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख टन लोहखनिजाचा साठा आहे.
- २) गडचिरोली
- गडचिरोली जिल्ह्यात प्राचीन स्तरीत खडकात लोहखनिजाचे साठे आहेत.
- मसोली, दमकोट, सुरजागड, पुसरे, पडवी, भामरागड, देऊळगाव भागात लोहखनिज सापडते.
- देऊळगाव व भामरागड येथे उच्च दर्जाचे लोहखनिज सापडते.
- सुरजागड भागातील साठे चांगल्या प्रतीचे आहेत.सुरजागड विभागात अंदाजे २७५ दशलक्ष टन लोहखनिजाचा साठा आहे.
- पूर्व विदर्भ – लोहारा,असोला,देवळगाव,बिआसी,पिंपळराव,फुसेर,रत्नपूर,सुरजागड,वाढवी,दामकोट,मातबरसी,कच्चा टेकडी,मुखारा,हितपार,गुंदागाव,मेटा,पोयारकोटी,घांग्रामेटा,मखीला,मेडेडोर,मुऱ्हेगाव,विठालगाव,लंकाछाह आणि पाडूर.
- पूर्व विदर्भातील लोह पाषाण स्थूल असून यामध्ये ६१ ते ७१ टक्के असते.
- ३) गोंदिया
- गोरेगाव तालुक्यात आंबेतलाव व खुर्सीपार येथे मॅग्नेटाईट प्रकारचे लोहखनिज सापडते.
- गोंदिया जिल्ह्यात अग्निजन्य खडकात लोहखनिज सापडते.
- गोंदिया जिल्ह्यात ६.२ दशलक्ष टन लोहखनिज साठा असून यामध्ये ५४ टक्के लोह आढळते.
- ४) नागपूर
- नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यात काही प्रमाणात लोहखनिज सापडते. या जिल्ह्यात मध्यम प्रतीचे लोहखनिज सापडते.
- ५) भंडारा
- भंडारा जिल्ह्यात मॅग्नेटाईट प्रकारचे लोहखनिज सापडते. सन २०१३ नुसार भंडारा जिल्ह्यात ४६ लाख टन लोहखनिज साठा आहे.
- ६) कोल्हापूर
- शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिज साठे आहेत.
- ७) रायगड
- रायगड जिल्ह्यात जांभ्या खडकात लोहखनिज सापडते.
- ८) सिंधुदुर्ग
- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात रेडी व बांदा विभागात धारवाड श्रेणीच्या खडकात लोहखनिज आहे.त्यावर लॅटेराईटचे थर असून त्यात लोहाचा अंश ५० ते ६० टक्के आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यात लोहखनिज सापडते याशिवाय मालवण परिसरात लोहखनिज साठे आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोहखनिजात सिलिकाचे प्रमाण अधिक आहे.
- सन २०१३ नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ कोटी ५४ लाख टन लोहखनिज साठा आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात रेडी,टाका,असोली,आजगाव,शिरोडा व नानोसा तर सावंतवाडी तालुक्यात तळोणे,गुल्दावे,किन्हाळा,कवठानी,सताडी,सातोली,अरीस,ठाकूरवाडी,नळेवाडी,मातोंड,ठ्बोले व तेंडोली या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आहेत.
चुनखडी
- कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या दुहेरी कार्बोनेटमधून चुनखडी मिळते. चुनखडीचे रासायनिक नाव CaCo3आहे.
- चुनखडीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम कार्बोनेट असते.
- चुनखडीमध्ये काही ठिकाणी अल्प प्रमाणात फॉस्फरस, लोहखनिज, सिलीका, अॅल्युमिनिअम,सल्फरचे प्रमाण आढळते.
- चुनखडीचे उपयोग रासायनिक उद्योग, कापड उद्योग, लोह शुद्ध करणे, कागद उद्योग, साखर उद्योग, खतनिर्मिती उद्योग,सिमेंट उद्योग, फेरो मॅगनीज उद्योग या उद्योगात चुनखडीचा उपयोग होतो.
- देशातील चुनखडीच्या एकूण साठ्यापैकी ९ टक्के साठा महाराष्ट्रात असून देशातील एकूण चुनखडी उत्पादनापैकी २ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.महाराष्ट्रात चूनखडीचे अंदाजे 4000 दशलक्ष टन इतके साठे आहेत.
- राज्यात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, अमरावती, नांदेड, नागपूर,धुळे,नंदूरबार, पुणे व सांगली जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते.अंतर ट्रोपी थरामधील चूनखडी आणि कंकर
- यवतमाळ
- वणी तालुक्यात शिंदोली राजूर, चनाखा, परमडोह, राळेगाव तालुक्यात गोराळा, मारेगाव तालुक्यात मुकुटवन येथे चुनखडीचे साठे आहेत.
- वणी तालुक्यातील राजूरची चुनखडी दर्जेदार म्हणून विशेष प्रसिद्ध आहे.
- यवतमाळ जिल्ह्यात ४१ कोटी टनाहून अधिक चुनखडीचे साठे आहेत.
- राज्यातील चुनखडीच्या एकूण साठ्यापैकी ५४ टक्क्याहून अधिक साठे यवतमाळ जिल्ह्यात आहेत.
- चंद्रपूर
- वरोडा व राजुरा हे तालुके चुनखडीच्या दृष्टिने महत्वाचे आहेत.
- राजुरा तालुक्यातील नारंदा-पिप्री-वानुजा, चांदूर, गंगापूर-बाकर्डी, अवरपूर, सांगोडा येथे चुनखडीचे साठे आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात ७५ कोटी टनाहून अधिक चुनखडीचे साठे आहेत.
- राज्यातील चुनखडीच्या एकूण साठ्यापैकी ५५ टक्क्याहून अधिक साठे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
- हा चुनखडक बारीक कणांचा आणि करड्या रंगाचा असतो.
- चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा तालुक्यात आलेवाही रेल्वे स्टेशनजवळ पुरुकेपार,कोंडारा,कामागोहन,मरथा आणि नीलजाईजवळ चूनखडी सापडते.
- चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे अंदाजे साठे १०२६ दशलक्ष टन आहेत.
- गडचिरोली
- सिरोंचा तालुका, अहेरी तालुक्यातील कोतेपल्ली व देवळमारी येथे चुनखडी सापडते.
- अहमदनगर
- कंडूर, कामूर व खांडेरावाडी येथे चुनखडक सापडतो. याशिवाय धुळे, नंदुरबार, नांदेड, पुणे व सांगली येथे कनिष्ठ प्रतीचे चुनखडीचे साठे आहेत.75% Calcium Carbonate.
- सन २०१३ नुसार राज्यात चुनखडीचे १३७ कोटी टन साठा आहे.
- नांदेड जिल्ह्यात चूनखडीचे साठे ३ दशलक्ष टन आहेत.
- धुळे नंदूरबार जिल्ह्यात ४० दशलक्ष टन चुनखडीचे साठे आहेत,हे कनिष्ठ दर्जाचे आहेत.
- पुणे आणि सांगली जिल्ह्यात कनिष्ठ दर्जाचे साठे आहेत.
डोलोमाईट
- डोलोमाईट (CaMgCo3) म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट.
- चुनखडीच्या अखनिज द्रव्यामध्ये जेव्हा मॅग्नेशियमचे प्रमाण ४५ टक्क्यापेक्षा जास्त असते, तेव्हा त्या खनिजास डोलोमाईट म्हणतात.
- डोलोमाईट उपयोग
- मॅग्नेशियम निर्मिती उद्योग, रबर उद्योग, खत उद्योग, रासायनिक उद्योग, काच निर्मिती उद्योग, सिमेंट उद्योग, रंगनिर्मिती उद्योग या उद्योगांत डोलोमाईटचा उपयोग केला जातो.
- देशातील एकूण डोलोमाईटच्या साठ्यापैकी महाराष्ट्रात फक्त ५ टक्के साठा आहे. डोलोमाईटच्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन लोह-पोलाद निर्मितीसाठी वापरतात व बाकीचे खत कारखान्यात वापरतात.
- राज्यात यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात डोलोमाईटचे साठे आढळतात.
- सन २०१३ नुसार राज्यात ६ कोटी १३ लाख टन डोलोमाईटचे साठे आहेत.
- सन २०१३ नुसार राज्यात डोलोमाईटचे सर्वाधिक साठे यवतमाळ जिल्ह्यात (४८%) आहेत.
- विंध्ययन युगातील हे खनिज असून ते चुनखडीसोबत आढळते.
- भारतात डोलोमाईटच्या एकूण साठ्यापैकी फक्त 5 टक्के साठा महाराष्ट्रात आहे.
कायनाइट व सिलीमनाईट
- देशातील एकूण कायनाइट साठ्यापैकी महाराष्ट्रात २ टक्क्याहून कमी कायनाइटचा साठा आहे.
- देशाच्या एकूण कायनाइट उत्पादनापैकी १५ टक्के कायनाइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते.
- हिऱ्यांना पैलू पाडणे, काच उद्योग, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, विद्युत उपकरणे इत्यादी उद्योगात कायनाइट वापरतात.
- राज्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कायनाइटचे साठे आहेत.
- भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात मोगरा, दहेगाव, पिंपळगाव व भंडारा तालुक्यात गार्काभोंगा येथे कायनाइटचे उत्पादन होते.
- सन २०१३ नुसार राज्यात २६ लाख १८ हजार टन कायनाइटचा साठा आहे.
क्रोमाईट
- भारतात क्रोमाईटचे सर्वाधिक साठे ओरिसा राज्यात आहेत.
- राज्यात क्रोमाईटचे साठे सामान्य दर्जाचे आहेत.
- क्रोमाईट हा काळसर भुरकट रंगाचा धातू आहे.
- क्रोमाईटधातूमध्ये क्रोमियम धातू ५० टक्क्यापर्यंत असतो.
- क्रोमाईटधातू उच्च तापमानांकाचा असल्यामुळे तो विटाच्या स्वरूपात भट्टीमध्ये उपयोगात आणतात.
- क्रोमाईटधातू नैसर्गिक स्वरूपात सर्पेटाइन, ड्युनाइट, पेरिडोटाइट या प्रकारच्या खडकात आढळतो.
- मौल्यवान खड्यांना पैलू पाडणे, काच उद्योग, पोलाद तयार करणे, टनिंग उद्योग, रंगद्रव्याचा उद्योग व डाईंग उद्योगात क्रोमाईट वापरतात.
- राज्यात भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रोमाईट आढळते.
- नागपूर जिल्ह्यात टाका भागात क्रोमाईटचे साठे आढळतात.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात बागदा व जानोली येथे क्रोमाईट आढळते.
- भंडारा जिल्ह्यात मौनी भागात क्रोमाईटचे साठे सापडतात.
- चंद्रपूर व रत्नागिरी जिल्ह्यातही थोड्या प्रमाणात क्रोमाईट सापडते.
- सन २०१३ नुसार राज्यात ६ लाख ६१ हजार टन क्रोमाईटचा साठा आहे.
तांबे
- तांब्याचे साठे गाळाच्या आणि रूपांतरित खडकात आढळतात.
- भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन राजस्थानात होते.
- नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात तांबे सापडते.
- चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात अल्प साठे आहेत.
- तांबे धातू सुसंवाहक असल्यामुळे विद्युत वाहकात वापरतात.
- काचेच्या वस्तू, निरनिराळी भांडी, रंग, नाणी, रासायनिक उद्योग, किटकनाशके, कलाकुसरीच्या वस्तू,टेलिफोनच्या वस्तू, विणकाम, युद्धसाहित्य इत्यादीमध्ये तांबे वापरतात.
- सोने, चांदी, शिसे इत्यादीमध्ये मिश्र धातू म्हणून तांबे वापरतात.
- शुद्ध तांब्यात स्वास्थवर्धक गुण असल्यामुळे आयुर्वेदामध्ये वापरतात.
अभ्रक
- जागतिक उत्पादनाच्या ६० टक्के अभ्रकाचे उत्पादन भारतात होते.
- देशातील अभ्रकाच्या एकूण साठ्यापैकी १५ टक्के साठा महाराष्ट्रात आहे.
- ‘मस्कोव्हाइट' प्रकारचे अभ्रक उत्कृष्ट मानले जाते.
- अभ्रक विद्युत विरोधक असल्यामुळे विद्युत उपकरणात वापरतात.
- रंगनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक उद्योग, आयुर्वेदिकदृष्ट्या औषधनिर्मितीत अभ्रक वापरतात.
- पूर्व विदर्भात अल्प प्रमाणात अभ्रक आढळते.
- गडचिरोली जिल्ह्यात अभ्रकाचे साठे आढळतात.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली व कुडाळ तालुक्यात अभ्रकाचा साठा आहे.
जिप्सम
- भारतात जिप्सम स्तरित खडकात सापडते.
- सिमेंट निर्मिती, रासायनिक खते, कागदनिर्मिती, वस्त्रोद्योग, कीटकनाशके, रंगनिर्मिती, निरनिराळी भांडी, साचे किंवा बोर्ड तयार करण्यासाठी जिप्सम वापरतात.
- भारतात सर्वात मोठा जिप्समचा साठा राजस्थानात आहे.
- राज्यात पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आदेवाडी भागात जिप्सम साठे आहेत.
इल्मेनाइट
- रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णगड व मालगुंड भागात इल्मेनाइट सापडते.
व्हेनाडिअम
- गोंदिया व भंडारा जिल्ह्यात व्हेनाडिअम सापडते.
- राज्यात सर्वात जास्त व्हेनाडिअम साठे गोंदिया जिल्ह्यात आहेत.
गॅलियम
- नागपूर जिल्ह्यात काही मँगनीज धातुकात गॅलियम आढळते.
टंगस्टन
- युद्धसाहित्य तयार करण्यासाठी टंगस्टन वापरतात.
- टंगस्टन प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात सापडते.
वालुकाश्म
- नागपूर, अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यात वालुकाश्म सापडते.
अॅस्बेस्टॉस
- पुणे व अहमदनगर जिल्ह्यात अॅस्बेस्टॉस सापडते.
क्वार्टझाईट
- गोंदिया व भंडारा जिल्ह्यात क्वार्टझाईटचे खडक आढळतात.
शिरगोळा
- शिरगोळापासून रांगोळी तयार करतात.
- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली तालुक्यात शिरगोळा सापडतो.
ग्रेनाइट
- महाराष्ट्राच्या पूर्वभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व पश्चिमेस ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रेनाइट सापडते.
खनिज तेल
- कोकणात ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झऱ्यात खनिज तेल हे औषधी उपयोगी खनिज आढळते.
बेसॉल्ट
- रस्ते, धरणे, इमारत बांधकामासाठी बेसॉल्ट वापरतात.
- महाराष्ट्राचा पूर्व भाग व दक्षिण कोकण भाग वगळता राज्यात सर्वत्र बेसॉल्ट आढळतो.
जांभाखडक
- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर (कोकण), सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
- व चंद्रपूर जिल्ह्यात जांभा दगड सापडतो. रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम दर्जाचा जांभा दगड मिळतो.
सिझियम
- गोंदिया, भंडारा जिल्ह्यात हिरव्या अभ्रकात कमी प्रमाणात सिझियम आढळते.
सिलिका
- रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात सिलिका खनिज सापडते.
संगमरवर
- नागपूर जिल्ह्यात अल्पप्रमाणात संगमरवर सापडते.
बायराइट्स
- बायराइट हे अग्निजन्य खडकात सापडते. रंग, कागद, रबर उद्योगात बायराइट वापरतात, रत्नागिरी,
- कोल्हापूर व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बायराइटस सापडते. महाराष्ट्रात सर्वात जास्त बायराइटस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडते.
पांढरी माती
- भंडारा जिल्ह्यामध्ये पांढरी माती सापडते.
मीठ
- कोकण किनारपट्टीलगत ठाणे,रायगड, मुंबईजवळ मीठ तयार केले जाते. आहारात, खतनिर्मिती,
- रासायनिक उद्योगात मिठाचा वापर होतो.
सिलिकामय वाळू
- सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात सिलिकामय वाळू सापडते.
चिनीमाती
- रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात चिनीमाती आढळते.
गारगोटी
- गारगोटीचे साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.
बराईट
- अग्निजन्य खडकामध्ये बराईट आढळते.याचा उपयोग रबर,कागद व रंग उद्योगात होतो,ते कोल्हापूर,रत्नागिरी व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आढळते.
इतर खनिजे
- बेसालट खडकाच्या पोकळ्यात साचलेली कल्सेडोनी,अकिक,जमुनिया,ओपलसारखी उपरत्ने आढळतात.तसेच
- कुरुविंद,गार्नेट,सोपस्टोन,फ्लींट,चर्ट,ग्राफाईट,अडल्यूसाईट,विविध प्रकारची झिओलाईट इत्यादी उपयुक्त खनिजे महाराष्ट्रात आढळतात.
संकीर्ण
- महाराष्ट्रात खनिजसंपत्तीचे प्रमुख क्षेत्र विदर्भामध्ये आहे.
- महाराष्ट्रात पूर्व विदर्भाच्या खालोखाल कोकणात खनिजसंपत्ती केंद्रित झाली आहे.
- मराठवाडा प्रादेशिक विभागात खनिजाचे सर्वात कमी उत्पादन होते.
- महाराष्ट्रात प्रमुख खनिजाच्या उत्खननासाठी २८५ खनिजपट्टे व गौणखनिजाचे २०३ खनिजपट्टे आहेत.
- पूर्व विदर्भ व दक्षिण कोकणात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर खनिजसंपत्ती आढळते.
- महाराष्ट्रात खनिजसंपन्न क्षेत्र भू-क्षेत्राच्या २.५ टक्के आहे.
- महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी १२.३३ टक्के (३८ हजार चौ.किमी.) क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्रात खनिज उत्पादन क्षेत्र ५८ हजार चौ.किमी (एकूण क्षेत्रफळाच्या १९%) आहे.
- भारतातील सर्व प्रकारच्या खनिजाच्या ४.१ टक्के खनिजाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात वर्धा-वैनगंगा नदीच्या खो-यात सर्वात जास्त खनिजाचे उत्पादन होते.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिजसंपत्ती चंद्रपूर जिल्ह्यात आढळते.
- महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ १९७३ मध्ये नागपूरला स्थापन झाले. त्याचा उद्देश खनिजसंपत्तीचे जास्तीत जास्त उत्पादन व विकास करणे हा आहे.
- भारतातील लोहखनिजाच्या साठ्यापैकी २० टक्के साठे महाराष्ट्रात आहेत.
- भारतातील लोहखनिज ८५ टक्के हेमेटाईट ८ टक्के मॅग्नेटाईट व ७ टक्के लिमोनाईट व सिडेराइट प्रकारची आहेत.
- महाराष्ट्रात लोहखनिजाचे प्रमुख साठे विदर्भात आहेत.
- मॅग्नेटाईट हे सर्वात उच्च दर्जाचे लोहखनिज आहे.
- सिडेराइट हे निकृष्ट दर्जाचे लोहखनिज आहे.
- महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोहखनिजाचे सर्वाधिक साठे आहेत.
- दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोहखनिज सापडते. ,
- पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळते.
- महाराष्ट्रात लोहखनिजाचे महत्त्वाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरापासून जपानला लोहखनिज निर्यात होते.
- लोह अतिशय महत्त्वाचा धातू असून त्यापासून बिडाचे लोखंड, घडीव लोखंड व पोलाद तयार केले जाते. लोह खनिज लोहाचे प्रमाण -
- मॅग्नेटाइट ७२ टक्के
- हेमेटाइट ७० टक्के
- लिमोनाइट ६० टक्के
- सिडेराइट ४८ टक्के
- मॅगनीज धातूच्या साठ्यात ओरिसा राज्याचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
- मॅगनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
- मॅगनीज धातू प्राचीन रूपांतरित खडकामध्ये आढळतो.
- मॅगनीज अशुद्ध संयुगाच्या स्वरूपात आढळतो.
- महाराष्ट्रात मॅगनीजचे प्रमुख साठे नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भारतातील मॅगनीजच्या मोठ्या साठ्यापैकी एक साठा महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅगनीजचे साठे जांभा खडकात विखुरलेल्या धोंड्याच्या स्वरूपात आढळतात.
- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी १० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात.
- महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे उच्च प्रतीचे आहेत.
- रायगड जिल्ह्यातील काही बॉक्साईट निर्यात केले जाते.
- हिंदुस्थान अॅल्युमिनिअम कार्पोरिशनकडून रत्नागिरी येथील अॅल्युमिनिअम प्रकल्प चालवला जातो.
- रायगड जिल्ह्यात मुरूड तालुक्यात सुनेगाव, सावरोली, काशिद व श्रीवर्धन तालुक्यात भारखेड, खुजारे,
- बावे, डांगोरी, सामगाव, पुनखेली येथे बॉक्साईट सापडते.
- डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रात धारवाड श्रेणीत सापडतो.
- सौसर प्रस्तर समूहाशी निगडित असलेले डोलोमाईटचे साठे फक्त नागपूर जिल्ह्यात आढळतात.
- हिंदुस्थान कॉपर लिमिटेड या सार्वजनिक कंपनीच्या तांबे उत्पादक प्रकल्प महाराष्ट्रात तळोजा (रायगड) येथे आहे.
- सिलिमनाईट व कायनाईटचे साठे प्रामुख्याने गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आढळतात.
- आर्कियन व गोंडवन प्रस्तर समूहाशी मातीचे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत.
- व्हॅनेडिअम व सिझियमसारखी खनिजे गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आढळतात.
- महाराष्ट्रात बेसॉल्ट खडक पूर्व विदर्भ व कोकण वगळता सर्वत्र आढळतो.
- भंडारा जिल्ह्यात सिलोमिलोन हे खनिज आढळते.
- अॅल्युमिनिअम हा हलका, न गंजणारा, वीजवाहक व तांब्यापेक्षा स्वस्त धातू आहे, म्हणून तो भांडीनिर्मिती, वीजेची उपकरणे, वाहननिर्मिती अशा अनेक उद्योगात वापरतात. महाराष्ट्रात नैऋत्य व पूर्व भागात खनिजसंपत्ती एकवटलेली आहे.
- महाराष्ट्रात सिलिका सँड साठे रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात.
- महाराष्ट्रामध्ये कंकर या खनिजाचे साठे नांदेड, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतात.
- महाराष्ट्रात खनिज साधनसंपत्ती प्रमुख क्षेत्रे पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर,यवतमाळ जिल्ह्यात आहेत.
- महाराष्ट्रात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक पश्चिमेकडे आहे.
- महाराष्ट्रात नागपूर-चंद्रपूर हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. गोंदिया जिल्ह्यात देवरी व आमगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रॅनाईट सापडते. रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णगड, दाभोळ, हर्णे व देवरूख येथे उत्तम दर्जाचा जांभा दगड आढळतो.
- भंडारा जिल्ह्यात तुमसर, कवडसी व आग्री भागात पांढरी माती सापडते.
- वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली तसेच औद्योगिक व कृषी क्षेत्रातून वाढती मागणी यामुळे खनिजाची व उर्जेची मागणी सतत वाढत आहे. खनिजे व ऊर्जासंसाधने ही अपुनर्नवीकरणीय (नष्ट होणारी) संसाधने आहेत, त्यामुळे खनिज संवर्धन आवश्यक आहे.
ऊर्जासाधने
- मानवी जीवनाच्या विकासात ऊर्जा संपत्तीला महत्त्वाचे स्थान आहे. घरकामासाठी, शेतीच्या सिंचन तसेच औद्योगिकरणासाठी ही ऊर्जा संपत्ती महत्त्वाची आहे. उर्जासंपत्ती ही औद्योगिक कांतीचा प्रमुख आधार आहे.उर्जासंपत्तीच्या उपलब्धतेवरच देशाचा आर्थिक व सामाजिक विकास अवलंबून असतो.
- उर्जासंपत्तीचे दोन गटात वर्गीकरण केले जाते.
- १.पारंपारिक ऊर्जासंपत्ती - दगडी कोळसा,जलविद्युत,खनिज तेल,नैसर्गिक वायू.
- २.अपारंपारिक ऊर्जासंपत्ती - सौरशक्ती, पवनऊर्जा, भू-औष्णिक ऊर्जा, सागरी लाटा, टाकाऊ पदार्थापासून निर्माण केलेली ऊर्जा, अणुशक्ती.
- १) पारंपारिक ऊर्जासंपत्ती
- १) दगडी कोळसा
- दगडी कोळसा जलजन्य व स्तरित खडकाचा प्रकार असून त्याची निर्मिती वनस्पतीपासून होते. अतिप्राचीन काळी सध्या जेथे कोळसा सापडतो, तेथे घनदाट जंगले होती. भूकवचातील हालचालीमुळे भू-पृष्ठावरील वनस्पती जमिनीखाली गाडल्या गेल्या. या गाडल्या गेलेल्या वनस्पतीवर खडकाचा प्रचंड दाब व भूगर्भातील प्रचंड उष्णता यामुळे वनस्पतीमधील पाण्याचा अंश नाहीसा होऊन फक्त कार्बन शिल्लक राहिले. त्या कार्बनचे रूपांतर नंतर कोळशात झाले. दगडी कोळसा अग्निजन्य आणि रूपांतरित खडकात आढळत नाही, तर तो स्तरित खडकात आढळतो. म्हणजे दगडी कोळसा हा स्तरित खडकाचा प्रकार आहे. कोळशात असणारे कार्बनचे प्रमाण व त्याची उष्णता देण्याची क्षमता यावरून कोळशाचे पाच प्रकार पडतात.
- १) अँथ्रासाईट
- हा सर्वात उच्च प्रकारचा कोळसा आहे.
- यामध्ये कार्बनचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते.
- हा रंगाने काळा, जड व चकाकणारा कोळसा असतो.
- हा कोळसा लवकर पेटत नाही; परंतु एकदा पेटला की लवकर विझत नाही म्हणजेच भरपूर उष्णता
- देतो.
- हा कोळसा जळताना फारसा धूर होत नाही. त्याची राख कमी पडते.
- हा कोळसा उत्तम इंधन म्हणून उपयुक्त आहे.
- २) बिटुमिनस
- यामध्ये कार्बनचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते.
- या प्रकारच्या कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त प्रमाणात असतो.
- हा कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असते. राखही कमी प्रमाणात पडते.
- हा कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.
- लोखंड वितळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोकच्या निर्मितीकरिता हा कोळसा वापरतात.
- या कोळशाचे कोकींग कोल, गॅसकोल, स्टीमकोल असे तीन उपप्रकार पडतात.
- जगातील एकूण उत्पादित होणाऱ्या कोळशापैकी सुमारे ५० टक्के कोळसा बिटुमिनस प्रकारचा आहे.
- ३) लिग्नाईट
- हा कोळसा हलक्या प्रतीचा आहे.
- या कोळशात कार्बनचे प्रमाण ४० टक्के असते.
- हा कोळसा तपकिरी रंगाचा असतो.
- या कोळशात ओलावा मोठ्या प्रमाणात असतो.
- जळताना या कोळशातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो व राख शिल्लक राहते व अतिशय कमी उष्णता प्राप्त होते.
- या कोळशाचा उपयोग वीजनिर्मिती, गॅस, डांबर, मेण व कृत्रिम पेट्रोलियम तयार करण्यासाठी केला जातो.
- ४) पीट
- हा सर्वात हलक्या दर्जाचा कोळसा आहे.
- या कोळशात कार्बनचे प्रमाण ४० टक्क्यापेक्षा कमी असते.
- पीट कोळसा हा लाकूड व लिग्नाइट यांच्या दरम्यानची अवस्था असते.
- हा कोळसा जळताना फार धूर निघतो व उष्णता फार कमी मिळते.
- हा कोळसा घरगुती वापरासाठी उपयोगात आणला जातो.
- ५) कॅनल
- या कोळशामध्ये सर्वात कमी प्रमाणात कार्बन असतो.
- या सर्वात निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा वापर डांबर तयार करण्यासाठी करतात.
- औष्णिक विद्युतनिर्मिती, वीज उत्पादन, डांबर, रंग, रसायने, उद्योगधंदे, रेल्वे, अमोनियम सल्फेट प्रोड्यूसर वायूची निर्मिती, हलके तेल, सिमेंट, कागदनिर्मिती इत्यादींमध्ये दगडी कोळशाचा उपयोग होतो.
- दगडी कोळसा हे अतिमहत्त्वाचे शक्तीसाधन असून, त्यास काळा हिरा म्हणतात.
- भारतातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यापैकी ४ टक्के साठा महाराष्ट्रात आहे.
- महाराष्ट्रात कोळशाचे जवळपास ५००० दशलक्ष टन साठे असावेत असा अंदाज आहे.
- सन २०११ रोजी महाराष्ट्रात दगडी कोळशाचे ३८,000 हजार मेट्रिक टन उत्पादन झाले.
- महाराष्ट्रातील कोळसा उच्च व मध्यम प्रतीचा आहे.
- महाराष्ट्र राज्यातील कोळशाचा दर्जा ग्रेड १ ते ४ असा आहे.काही थर पहिल्या व दुसऱ्या प्रतीचे असून त्यातील कोळसा झारखंडमधील झारिया येथील कोकक्षम कोळशात १५ ते २०% प्रमाणात मिसळून वापरता येण्यासारखा आहे.
- चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात दगडी कोळशाच्या २२ खाणी आहेत.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत.
- देशातील ६० टक्के विद्युतनिर्मिती दगडी कोळशापासून होते.
- महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने खापरखेडा, बल्लारशा, पारस येथील औष्णिक वीज केंद्रात तसेच उद्योगधंदे व रेल्वेसाठी केला जातो.
- महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने खालील तीन विभागात आढळतात.
- १) वैनगंगा नदीचे खोरे
- नागपूर जिल्ह्यातील कामठी, उमरेड, पाटणसांवगी इत्यादी दगडी कोळशाच्या खाणींचा समावेश होतो.
- या भागात अंदाजे ७० ते ७५ दशलक्ष कोळशाचे साठे असावेत, असा अंदाज आहे.
- उमरेडचा निम्मा साठा १०० मीटरच्या आत आहे.
- २) वर्धा नदीचे खोरे
- वर्धा नदीच्या खोऱ्यात वणी (२४० दशलक्ष टन),,बांदर (१०० दशलक्ष टन), बल्लारपूर (2000 दशलक्ष टन),, वरोडा (६० दशलक्ष टन),दुर्गापूर (२४० दशलक्ष टन), बून इत्यादी ठिकाणी कोळशाचे साठे आहेत.
- बांदर चे कोळसा क्षेत्र ३१ चौ.कि.मी.असून कोळशाचा थर १ ते ६ मीटर जाडीचा आहे.
- वरोडा क्षेत्रात वरच्या बाजूस ५ मीटर जाडीचा व ३.३ जाडीचा खालचा कोळशाचा थर आहे.
- वरोडा ते नवकातडा दरम्यान ३६ कि.मी.लांबीचा दक्षिण उत्तर पट्टा आहे.
- चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांचा सीमावर्ती प्रदेश
- चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती प्रदेशात घुगूस-तेलवासा (१००० दशलक्ष टन), सास्ती-राजुरा (१०० दशलक्ष टन),मांजरी (५० दशलक्ष टन), इत्यादी ठिकाणी दगडी कोळशाचे साठे आढळतात.
- राजुरा व बुन क्षेत्रात पीसगाव ते वरोडा यामध्ये सुमारे ३१ चौ.कि.मी.क्षेत्रात ६ ते १० मीटर जाडीचे तीन थर आहेत.
- चंद्रपूर-बल्लारपूर भागात बराचसा कोळसा १७ मीटर जाडीच्या थराच्या पट्ट्यात पाच खाणी आहेत.
- महाराष्ट्रातील कोळसा खाणी
- भूवैज्ञानिकदृष्ट्या महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा थर गोंडवनी संघाच्या व ‘दामुदा मालेतील बाराकर समुदायातील खडकात आढळतो.
- राज्यात पूर्व विदर्भात चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने दगडी कोळशाचे साठे आढळतात.
- १) चंद्रपूर
- राज्यातील एकूण साठ्यापैकी 70 टक्के साठे चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यात आहेत.
- चंद्रपूर तालुक्यात चंद्रपूर व घुगुस, राजुरा तालुक्यात सास्ती, भद्रावती तालुक्यात मांजरी, वरोडा तालुक्यात वरोडा व बल्लारपूर येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
- २) नागपूर
- कामठी, उमरेड, सावनेर, सिलेवारा, पाटणसांवगी परिसरात दगडी कोळशाचे साठे आहेत.
- कन्हान ते सावनेर भागात मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे साठे आहेत.
- उमरेड तालुक्यात दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे.
- ३) यवतमाळ
- मारेगाव तालुक्यात आष्टोना, वणी तालुक्यात वणी व राजुरा, उमरखेड तालुक्यात ठाणकी, डिग्रस तालुक्यात चिंचोली येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
- ४) वर्धा
- वर्धा जिल्ह्यात दगडी कोळशाचे अल्पसाठे आहेत.
- महाराष्ट्र राज्यात कोळशाचे उत्पादन १९६१ साली 6 लाख टन होते ते 1994 मध्ये 150 लाख टनापर्यंत वाढले.
- दगडी कोळशाचा उपयोग.
- औष्णिक केंद्रामध्ये – खापरखेडा,बल्लारपूर,पारस.
- प्रोड्युसर नावाचा वायू तयार करण्यासाठी
- कोळशाचे कार्बनीकरन करून कोक,इंधन,वायू,हलके तेल.अमोनिअम सल्फेट इत्यादी पदार्थ मिळविता येऊ शकतात.
जलविद्युत
- जलविद्युतशक्ती अक्षयऊर्जा साधन म्हणून ओळखली जाते.
- जलविद्युतशक्ती दगडी कोळसा व खनिज तेलापासून मिळणाऱ्या वीजेपेक्षा अधिक स्वस्त व उपयुक्त आहे.
- जलविद्युतशक्ती निर्माण करताना किंवा उपयोग करताना धूर निर्माण होत नाही.
- दुर्गम प्रदेशातही विद्युतवाहक ताराद्वारे जलविद्युत शक्तीचे वहन करता येते.
- जलविद्युत निर्मितीस आवश्यक असणारे घटक
- नद्यांची उगमक्षेत्रे जास्त पावसाच्या प्रदेशात असावीत म्हणजे नदीला मुबलक पाणीपुरवठा होईल.
- नद्यांच्या उगमाकडील भाग बर्फाच्छादित असल्यास पावसाळ्यात पावसामुळे व उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे नद्यांना बारमाही पाण्याचा पुरवठा होईल.
- नद्यांच्या मार्गात भूभागाची रचना डोंगराळ किंवा पठारी स्वरूपाची उताराची असावी, त्यामुळे नद्यांच्या प्रवाहाला वेग येतो.
- नद्यांच्या मार्गात नैसर्गिक धबधबे असल्यास नैसर्गिक धबधब्यावर जलविद्युत निर्माण करणे स्वस्त व सोपे असते.
महाराष्ट्र - प्रमुख जलविद्युत प्रकल्प
- सातारा जिल्हा
- सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण आहे धरणाच्या जलाशयाला शिवाजीसागर म्हणतात. या जलाशयातून मिळणाच्या पाण्याचा जलविद्युतनिर्मितीसाठी वापर केला जातो. त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी (चिपळूण) येथे विद्युतनिर्मिती केंद्राची स्थापना केली आहे. पोफळीची विद्युतनिर्मिती क्षमता ५६० मेगावॉट आहे.
- पोफळी (तालुका चिपळूण) वीजकेंद्रातील पाणी शेवटी वशिष्ठी नदीमध्ये सोडले जाते.
- कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण विद्युतनिर्मिती क्षमता १,९२० मेगावॅट आहे.यामध्ये फोफळी – ५६० मेगावॉट,अलोरे – ३२० मेगावॉट,धरण पायथा – ४० मेगावॉट,तांबटवाडी – 1000 मेगावॉट.
- कोयना जलविद्युत प्रकल्पात लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग १३ मार्च, १९९९ रोजी यशस्वी केला. 6 मीटर लांबीचा खडक फोडला.
- कोयना जलविद्युत प्रकल्पात लेकटॅपिंगचा दुसरा प्रयोग २५ एप्रिल २०१२ रोजी यशस्वी केला.
- लेकटॅपिंग हे नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे.
- कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात.
- रायगड जिल्हा
- राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली (७२ मेगावॅट) येथे उभारले आहे.
- येथील वीजकेंद्रातील पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते.
- भिरा (१५० मेगावॅट) येथील जलविद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडले जाते.
- भिवपुरी (७२ मेगावॅट) येथे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.
- ठाणे जिल्हा
- वैतरणा धरण व भातसा हे महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत.
- कोल्हापूर जिल्हा
- चंदगड तालुक्यात तिल्लारी नदीवर तिल्लारी जलविद्युत प्रकल्प असून या प्रकल्पाला गोवा सरकारचे सहकार्य लाभले आहे.
- हिंगोली जिल्हा
- सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीवर येलदरी (५ मेगावॅट) जलविद्युत प्रकल्प आहे. या धरणाच्या जलाशयाचा जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी उपयोग होतो.
- पुणे जिल्हा
- जिल्ह्यात भाटघर, वीर, पवना, पानशेत व वरसगाव हे जलविद्युत प्रकल्प आहेत.
- या प्रकल्पाची एकूण क्षमता ५१ मेगावॅट आहे.
- अहमदनगर जिल्हा
- अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर भंडारदरा धरण असून या जलाशयास आर्थरसरोवर म्हणतात. जलाशयाचा उपयोग जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो.
- नागपूर जिल्हा
- पारशिवनी तालुक्यात पेंच नदीवर पेंच जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण विद्युतक्षमता ५३ मेगावॅट आहे.
- औरंगाबाद जिल्हा
- पैठणजवळ गोदावरी नदीवर जायकवाडी हा राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात. जलसिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी या जलाशयाचा उपयोग होतो.12 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते.
- सिंधुदुर्ग जिल्हा
- तिल्लारी – ६० मेगावॉट क्षमता
- सोलापूर जिल्हा
- उज्जनी.
- जलविद्युत निर्मितीला सुरुवात युरोप खंडात फ्रान्स देशात झाली.
- भारतात कर्नाटक राज्यात १९०२ साली शिवसमुद्रम येथे पहिला जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.
- रायगड जिल्ह्यातील खोपोली, भिरा व भिवपुरी जलविद्युत प्रकल्प टाटा वीज मंडळामार्फत चालविले जातात.
- सन २०१३-१४ च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालादारे सन् २०१२-१३ मध्ये राज्यात एकूण विद्युतनिर्मितीत (८८,१३९ दशलक्ष किलोवॅट तास) जलविद्युत वाटा ६.८ टक्के (५,९८० दशलक्ष किलोवॅट तास) आहे.
औष्णिक विद्युत
- दगडी कोळसा, लिग्नाईट, लाकूड, खनिजतेल अथवा नैसर्गिक वायू यांचा इंधन म्हणून वापर करून औष्णिक वीज निर्माण केली जाते.
- महाराष्ट्रात दगडी कोळशाचा सर्वाधिक वापर औष्णिक वीज निर्मितीसाठी केला जातो, त्यामुळे राज्यातील औष्णिक वीज निर्मितीकेंद्रे दगडी कोळसा खाणीच्या जवळ अथवा लोहमार्गावर आहेत.
- खनिज तेल(नफ्ता) किंवा भूगर्भ वायूच्या ज्वलनातून वायुजनित्र (gas टर्बाईन) चालवून विद्युत निर्मिती केली जाते,याला ओपन सायकल gas टर्बाईन म्हणतात.
- gas टर्बाईन मधून वापरून झालेला गरम वायू बॉयलरमध्ये पुन्हा वापरून वाफ तयार केली जाते.यापासून विद्युतनिर्मिती केली जाते याला वेस्ट हिट रिकव्हरी युनिट म्हणतात.आणि ओपन सायकल gas टर्बाईन आणि वेस्ट हिट रिकव्हरी युनिट ज्यावेळी एकत्रित कार्य करतात तेव्हा त्याला कंबाइंड सायकल gas युनिट म्हणतात.
- चोला औष्णिक विद्युतकेंद्र (ठाणे)
- कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीच्या कडेला चोला औष्णिक विद्युत केंद्र आहे. याची क्षमता ११८ मेगावॅट आहे. याद्वारे मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण-पुणे व मुंबई-कल्याण-इगतपुरी लोहमार्गाकरिता विद्युतपुरवठा केला जातो. चोला येथील केंद्राला मध्यप्रदेश, झारखंड, ओरिसा राज्यातून दगडी कोळसा पुरवठा होतो.
- तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र (मुंबई उपनगर)
- कोकणात तुर्भे (मुंबई उपनगर) येथे टाटा विद्युत मंडळाचा १,३३० मेगावॅट क्षमतेचा विद्युत प्रकल्प आहे.
- एकलहरे औष्णिक विद्युतकेंद्र (नाशिक)
- पश्चिम महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात एकलहरे येथे ९१० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.याची प्रगती १ ते ५ टप्प्यात झाली आहे.
- फेकरी औष्णिक विद्युत केंद्र (जळगाव)
- खानदेशात जळगाव जिल्ह्यात भुसावळजवळ फेकरी येथे ४८२.५ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक प्रकल्प आहे.याची प्रगती ३ टप्प्यांमध्ये झाली आहे.
- परळी औष्णिक विद्युत केंद्र (बीड)
- मराठवाड्यात बीड जिल्ह्यात परळी येथे ६९० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.याच्या विकासाचे १ ते ५ टप्पे आहेत.
- पारस औष्णिक विद्युत केंद्र (अकोला)
- विदर्भात अकोला जिल्ह्यात (बाळापूर तालुका) पारस येथे ६२.५ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक प्रकल्प आहे.
- कोराडी औष्णिक विद्युत केंद्र (नागपूर)
- विदर्भात नागपूर जिल्ह्यात कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प ११०० मेगावॅट क्षमतेचा आहे.
- कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.
- कोराडी औष्णिक प्रकल्पात दगडी कोळशाचा वापर करतात.
- याचे १ ते ४ व ५,६,७ असे टप्पे आहेत.
- खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र (नागपुर)
- विदर्भात नागपूर जिल्ह्यात खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प ४२० मेगावॅट क्षमतेचा आहे.या प्रकल्पात दगडी कोळशाचा वापर केला जातो.
- कोराडी आणि खापरखेडा हे दोन्ही औष्णिक विद्युत केंद्रे दगडी कोळशाच्या खाणीच्या परिसरात आहेत.
- बल्लारपुर औष्णिक विद्युत केंद्र (चंद्रपुर)
- विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प 1000 मेगावॅट क्षमतेचा आहे. येथे दगडी कोळशाचा वापर केला जातो.
- दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र (चंद्रपूर)
- विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर औष्णिक विद्युत प्रकल्प ८४० मेगावॅट क्षमतेचा आहे. येथे दगडी कोळशाचा वापर केला जातो.
- विदर्भात एकूण ५ औष्णिक विद्युत केंद्रे कार्यन्वित झालेली आहेत.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युतनिर्मिती औष्णिक विद्युत मार्गाने होते.
- मौदा औष्णिक वीज प्रकल्प ४ जाने.२०१३ रोजी नागपूर जिल्ह्यात सुरू झाला. या प्रकल्पाची क्षमता १,३२० मेगावॅट आहे.
- सन २०१३-१४ च्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवालानुसार २०१२-१३ मध्ये राज्यातील एकूण विद्युतनिर्मितीत ७५ टक्के हिस्सा (६६,०७५ दशलक्ष किलोवॅट तास) औष्णिक विद्युत निर्मितीचा होता.
अणुऊर्जा
- अणूचे विभाजन करून जी ऊर्जा निर्माण होते, तिला अणुविद्युत म्हणतात.
- अणुऊर्जेसाठी युरेनिअम, थोरियम, लिथियम, प्लुटोनियम यांसारख्या अणुइंधनाचा वापर केला जातो.
- अणुऊर्जा मिळविण्यासाठी युरेनिअम हे सर्वात महत्त्वाचे खनिज आहे.
- २८ ग्रॅम युरेनिअमपासून जेवढी उर्जा मिळते, तेवढ्या ऊर्जेसाठी १०० टन दगडी कोळसा वापरावा लागतो.
- १० ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली.
- होमी भाभा हे भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे जनक असून अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.
- अणुउर्जेचा उपयोग ऊर्जानिर्मिती, पाणबुड्या, उपग्रह प्रक्षेपक, क्षेपणास्त्र इत्यादी ठिकाणी केला जातो.
- भारतात तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कल्पकम (तामिळनाडू), नरोरा (उत्तरप्रदेश) काक्रापरा (गुजरात), कुडानकुलम (तामिळनाडू), कैगा (कर्नाटक), उमरेड नियोजित (महाराष्ट्र) ही अणुविद्युत केंद्र आहेत.
- जैतापूर (रत्नागिरी) हा महाराष्ट्रातील नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे.
- भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर - तुर्भे
- 20 जाने १९५७ रोजी भाभा अँटोमिक रिसर्च सेंटरची स्थापना झाली. १९६७ रोजी डॉ. होमी भाभा
- अंटोमिक रिसर्च सेंटर असे नामकरण केले.
- अणऊर्जेचा विकास करणे, अणुऊर्जेचा दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल यांचे संशोधन करणे. कृषी उद्योग, वैद्यकिय व्यवसाय, जैविकशास्त्रे इत्यादी क्षेत्राचा विकास करण्यासाठी समस्थानिकाचा निर्मिती करणे आणि ही क्षेत्रे स्वयंपूर्ण बनविणे ही भाभा अँटोमिक रिसर्च सेंटरची उद्दिष्टे आहेत.
- भाभा अँटोमिक रिसर्च सेंटरमार्फत अप्सरा, सायरस, झरलिना, पूर्णिमा आणि ध्रुव या संशोधन अणुभट्टया सुरू करण्यात आल्या आहेत.
- अप्सरा
- ४ ऑगस्ट १९५६ मध्ये इंग्लडच्या मदतीने अप्सरा ही पहिली अणुभट्टी उभारण्यात आली.
- या अणुभट्टीत समृद्ध युरेनियमचा वापर केला जातो.
- या अणुभट्टीची क्षमता १ मेगावॅट आहे.
- ही आशिया खंडातील पहिली अणुभट्टी आहे.
- सायरस
- ही तुर्भे येथील भारताची दुसरी अणुभट्टी आहे.
- १० जुलै १९६० पासून ही अणुभट्टी कार्यान्वित झाली.मदत –
- सायरस अणुभट्टीची क्षमता ४० मेगावॅट आहे.
- अणुविज्ञानाचा अभ्यास करणे व कृत्रिम किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती करणे हे सायरसचे उद्देश आहेत. या अणुभट्टीत तयार झालेल्या प्लुटोनिअमचा उपयोग भारताला अणुस्फोट चाचणीसाठी झाला.
- सायरस अणुभट्टी युरेनिअमवर कार्यान्वित होती. तिच्याकडून निर्माण होणा-या न्यूट्रॉन कणांना नियंत्रित ठेवण्याचे काम जड पाण्याकडून केले गेले.
- ही अणुभट्टी सप्टे.१९९७ पासून दुरुस्तीसाठी बंद आहे.
- झरलिना
- १४ जाने. १९६१ पासून झरलिना अणुभट्टी कार्यान्वित झाली.
- ही अणुभट्टी पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.
- १९८३ पासून ही अणुभट्टी बंद करण्यात आली आहे.
- पूर्णिमा - १ व २
- १९६१ साली ही अणुभट्टी सुरू झाली.
- या अणुभट्टीत युरेनिअम - २३३ हे इंधन वापरले जाते.
- ध्रुव
- ही अणुभट्ठी १९८५ पासून कार्यान्वित झाली.
- या अणुभट्टीची क्षमता १०० मेगावॅट आहे.
- अणुसंशोधनाची सोय, अणुइंधनावर पुन्हा प्रक्रिया करता येणारे तंत्रज्ञान, सर्वात जास्त क्षमतेने ऊर्जानिर्मिती ही ध्रुवची वैशिष्ट्ये आहेत.
- तारापूर अणुऊर्जा केंद्र
- नवनिर्मित पालघर जिल्ह्यात तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे.
- तारापूर हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे.
- तारापूर अणुविद्युत प्रकल्पाला अमेरिकेचे तांत्रिक साहाय्य लाभले आहे.
- तारापूर येथे दोन अणुभट्याच्या साहाय्याने १९६९ पासून अणुऊर्जेस सुरुवात झाली.
- तारापूर अणुभट्टीत समृद्ध युरेनिअम वापरले जाते.
- तारापूर अणूऊर्जा केंद्राची क्षमता ४२० मेगावॅट आहे.
- तारापूर येथे निर्माण होणारी वीज महाराष्ट्र व गुजरात राज्यांना पुरविली जाते.
- उमरेड अणुविद्युत केंद्र (नियोजित)
- नागपूर जिल्ह्यात उमरेड अणुऊर्जा केंद्र विकसित होत आहे. नागपूरच्या दक्षिणेस.
- जैतापूर अणुविद्युत केंद्र (नियोजित)
- रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर अणुविद्युत प्रकल्प फ्रान्स देशाच्या (अरेवा कंपनी) मदतीने उभारला जात
- आहे.
- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची क्षमता ९९०० मेगावॅट आहे.
- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरणदृष्ट्या विरोध होत आहे.
- भारतातील जडपाणी प्रकल्प
- हजीरा - गुजरात,
- तालचेर - ओरिसा
- मानुगुरू - आंध्रप्रदेश
- कोटा - राजस्थान
- थळ - महाराष्ट्र
- नांगल - पंजाब
- बडोदा - गुजरात
- तुतीकोरीन - तामिळनाडू
- भारताचा पहिला पॉवर रिअॅक्टर रिप्रोसेसिंग प्लॅट ट्रॉम्बे येथे सुरू झाला, तर जाने, २०११ मध्ये तारापूर येथे दुसरा प्लॅट सुरू झाला.
खनिजतेल व नैसर्गिक वायू
- वेगवेगळ्या वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून बनलेल्या विविध सेंद्रिय द्रव्याच्या मिश्रणापासून निसर्गतः खनिज तेलाची निर्मिती होते.
- अतिप्राचीनकाळी भूहालचालीमुळे वनस्पती व प्राणी जमिनीखाली गाडली गेली. त्यावर प्रचंड दाब पडून त्यातून उष्णता निर्माण झाली. वनस्पती व प्राणी यांचे कुजून विघटन झाले. त्यातून स्तरित खडकात खनिज तेल व कोळसा यांची निर्मिती झाली.
- अशुद्ध खनिज तेल वायूरूप, द्रवरूप व घनरूप अवस्थेत सापडते.
- खनिजतेल हे कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्याच्या संयोगाने निर्माण होते.
- खनिजतेल गाळाच्या स्तरित खडकात (वालुकाश्म, शेल, मृतिक खडक, चुनखडक) सापडते.
- पेट्रोल डिझेल, रॉकेल, व्हॅसलिन, रंग, बेंझीन, वंगण, मेण, इंधन, नॅप्था, डांबर, औषधे इत्यादी निर्मितीसाठी खनिजतेल उपयोगी पडते.
- खनिज तेलापासून उष्णता, प्रकाश व शक्ती (ऊर्जा) निर्माण केली जाते.
- १ फेब्रु. १९७४ रोजी मुंबईच्या पश्चिमेला सुमारे १७६ किमी अंतरावर अरबी समुद्रात सागरसम्राटने पहिली खनिज तेल विहीर खोदली.
- सागर सम्राट (जपानमध्ये बांधणी) हे खनिज तेलाचे संशोधन करणारे जहाज आहे.
- बॉम्बेहायमध्ये तेलाबरोबर ज्वलनवायू, नैसर्गिक वायु मिळतो. हा वाय तूर्भ येथील टाटा औष्णिक वीज केंद्रात वापरला जातो.
- बॉम्बेहायमधील तेल मुंबईमधील तेलशुद्धीकरण कारखान्यात शुद्ध केले जाते.
- १९९१ मध्ये रत्नागिरीजवळ सागरसम्राटाने तेलक्षेत्र शोधले.
- रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिजतेलाचे साठे आढळतात.
- भारतात खनिज तेल शुद्धीकरणाचा पहिला कारखाना दिग्बोई येथे उभारला.
- बॉम्बे हाय हे भारताचे दुसरे प्रमुख तेल उत्पादक क्षेत्र आहे.
- भारतात मुंबईजवळ ट्रॉम्बेचा सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना आहे.
- बॉम्बेहाय या क्षेत्रामध्ये भारतातील एकूण खनिज तेलाच्या ५० टक्के खनिजतेलाचे उत्पादन होते.या परिसरात सुमारे 2000 चौ.कि.मी.क्षेत्रात ५.५ कोटी टन तेल असण्याची शक्यता आहे.
- बॉम्बेहाय या क्षेत्रामध्ये ओ. एन. जी. सी. (ONGC) तर्फे खनिजतेलाच्या खाणी व विहिरी खोदल्या जातात.
- बॉम्बेहाय क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण (रायगड) येथे आणून साठवला जातो. तेथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
- बॉम्बेहाय येथील तेलक्षेत्रावर ONGC चे नियंत्रण आहे.
- वसईहाय येथेही तेलक्षेत्र आहे.
- उरण (रायगड) व मुंबईहाय येथील खनिज तेलापासून इथेन व प्रोपेन वायूवर प्रक्रिया करून इथिलीन मिळविला जातो.
- खनिजतेल व नैसर्गिक वायू नळावाटे खूप दूर अंतरापर्यंत सहज वाहून नेता येतो तसेच तो साठवूनही ठेवता येतो.
- मुंबईच्या दक्षिणेस बासेन क्षेत्रातही नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे.
- खनिज तेलाची ज्याप्रमाणे निर्मिती होते, त्याप्रमाणे नैसर्गिक वायूची भूगर्भात निर्मिती होते. हा वायू हलका असल्याने तेलावर साठून राहतो. तेल मिळविण्यासाठी जेव्हा विहीर खणली जाते, तेव्हा नैसर्गिक वायू मिळवावा लागतो.
- उद्योगधंदे, वाहतूक व दळणवळण व्यवसायांचा विकास खनिज तेलावर अवलंबून असतो.
- 1985-86 साली 5180 दशलक्ष घनमीटर, 1990-91 – 14082 दशलक्ष घनमीटर, 1993-94 -13356 दशलक्ष घनमीटर पर्यंत नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढले.
अपारंपारिक ऊर्जासंपत्ती
- ऊर्जेचे संकट कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जासाधनाच्या वापरावर व विकासावर भर देणे गरजेचे आहे. अपारंपरिक ऊर्जेला पुर्ननिर्मिती ऊर्जा म्हणतात, अपारंपरिक ऊर्जा प्रदूषणविरहीत स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अपारंपरिक ऊर्जा संसाधनांमध्ये पवनऊर्जा, सौर सागरी लाटांची ऊर्जा, भू-औष्णिक ऊर्जा यांचा समावेश होतो.
- पवन ऊर्जा
- पूर्वी जहाज चालविण्यासाठी, पिठाच्या गिरण्या चालविण्यासाठी, पाणी उपसण्यासाठी पवन ऊर्जेचा उपयोग केला जात होता.
- वाऱ्याच्या वेगाचा वापर करून पवनचक्कीची पाती फिरवतात. त्यांना जोडलेली विद्युतजनित्रे फिरतात, त्यामुळे ऊर्जा निर्माण होते तिला वात ऊर्जा म्हणतात.
- जेथे वाऱ्याचा वेग अधिक असून वार्षिक सरासरी पवन ऊर्जा घनता प्रति चौ.मी. २०० वॅटपेक्षा अधिक आहे, अशा ठिकाणी पवनचक्क्या उभारतात.
- पवनचक्क्याचे तंत्रज्ञान वाऱ्याच्या वेगापेक्षा त्याच्या घनतेवर व हवेच्या दाबावर जास्त अवलंबून असते
- सागर किनाऱ्यावर, नदीकाठी, उंच डोंगरावर पवनचक्क्या बसवितात.
- महाराष्ट्रात किनारपट्टीच्या प्रदेशात. सह्याद्री पर्वत, उपरांगा, डोंगरमाथे इत्यादी प्रदेशात वाऱ्याचा वेग पवनऊर्जा निर्मितीस योग्य आहे.
- महाराष्ट्रात पवन ऊर्जानिर्मितीसाठी सुयोग्य अशी २८ ठिकाणे आहेत.
- महाराष्ट्रात ९ ठिकाणी सुमारे ३९३ मेगावॅटचे खाजगी पवनऊर्जा प्रकल्प सुरू आहेत.
- महाराष्ट्राची पवनविद्युत निर्मितीक्षमता ५,९६१ मेगावॅट आहे.
- १९९४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथे १.५ मेगावॅट क्षमतेचा राज्यातील पहिला पवनफॉर्म स्थापन केला. जमसांडे-देवगड (सिंधुदुर्गे) येथे राज्यातील पहिला पवनऊर्जा प्रकल्प स्थापन केला आहे.
- भारतात पवनऊर्जा निर्मितीत पहिला क्रमांक तामिळनाडूचा असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे.
- एकूण भारताच्या १७ टक्के पवनउर्जा ही महाराष्ट्रात तयार केली जाते.
- महाराष्ट्रात १९९७ पासून पवनउर्जेच्या उत्पादनास सुरुवात झाली.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त पवनचक्क्या सातारा जिल्ह्यात आहेत.
- महाराष्ट्रात पवनऊर्जेपासून सर्वाधिक वीज उत्पादन सातारा जिल्ह्यात होते.
- आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात वनकुसवडे पठारावर (५०० मेगावॅट) आहे.
- धुळे जिल्ह्यात ब्राह्मणवेल येथे ५४५ मेगावॅट क्षमतेचे सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र उभारले जात आहे. पवनऊर्जानिर्मिती केंद्र उभारण्यास सुरुवातीला थोडा खर्च येत असला, तरी पवन ऊर्जा निर्मिती संच । बसविल्यानंतर लगेच ऊर्जानिर्मितीस सुरुवात होते. एकदा संच सुरू झाल्यानंतर कोणताही खर्च येत नाही. पवन ऊर्जा स्वस्त असते. या ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
- पवन ऊर्जा पारंपरिक ऊर्जा क्षेत्रापासून दूर विकसित करता येते.
- पवन ऊर्जा निर्मितीतील एकच दोष म्हणजे या केंद्राजवळ खूप आवाज येतो व तो त्रासदायक असतो. जागेची योग्य निवड, यंत्राची विशिष्ट रचना व ध्वनीरोधक यंत्रणाद्वारे हा त्रास कमी करता येतो. महाराष्ट्रात सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पवनऊर्जा प्रकल्प आहेत.
- महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (MEDA) मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात शहांजापूर येथे पवनऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.
- गुजरातमध्ये मांडवी येथील Eastern India Erector या नावाने १९८५ मध्ये व्यापारी तत्त्वावर उभारलेले पवनऊर्जा निर्मिती केंद्र आशिया खंडातील पहिले केंद्र आहे.
- पवन ऊर्जेच्या संशोधन व तंत्रज्ञानासाठी चेन्नई येथे C-WET center for wind Energy Technology उभारण्यात आले आहे.
- भारताची सन २०१४ ची पवनविद्युत निर्मिती क्षमता २१,१३६ मेगावॅट असून पवनविद्युत निर्मितीत चीन, अमेरिका, जर्मनी, स्पेननंतर भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
- महाराष्ट्र पवन ऊर्जा प्रकल्प आणि जिल्हा
- सातारा - वनकुसवडे, ठोसेघर, चाळकेवाडी, माळेवाडी
- सांगली - कवठेमंहाकाळ, गुडेपाचगणी, ढालगाव
- सिंधुदुर्ग - जमसांडे-देवगड, विजयदुर्ग
- अहमदनगर - कवड्या डोंगर, सुपा, शहांजापूर,
- पुणे- भीमाशंकर
- पवनचक्क्या कार्यान्वित होण्यासाठी वाऱ्याचा वेग दर सेकंदाला किमान ३ मीटर असेल तरच उत्पादन किफायतशीर ठरते.
- लहान पवनचक्क्याना ३ ते ७ मीटर तर मोठ्या पवनचक्क्याना ७ मीटरपेक्षा जास्त वेगाचा वारा लागतो.
- सेकंदाला १५ मीटर वेगाचा वारा सर्वात उत्तम समजला जातो.
- सेकंदाला २५ मीटरपेक्षा जास्त वेगाचा वारा पवनचक्क्याना प्रतिकूल ठरतो.
- महाराष्ट्रात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग सेकंदाला २१ मीटरपर्यंत आहे.
- पवनउर्जा प्रकल्प क्षेत्रात शेती तसेच गवताळ कुरणे वाढवून पशुपालन व्यवसाय करता येतो.
- सौर ऊर्जा
- सूर्यापासून मिळणारी उष्णता म्हणजे सौर ऊर्जा.
- सूर्यकिरणांच्या रूपाने पृथ्वीवर दिवसाच्या १२ तासात दर चौ.सेमी. मध्ये ५ लाख उष्मांक ऊर्जा मिळते.
- सौरऊर्जेचा वापर हा दोन पद्धतीनी केला जातो.
- १) सौर उष्णता तंत्रज्ञानाद्वारे (Solar thermal Technologies) अन्नसुरक्षित ठेवणे, धान्य वाळविणे, उष्णता देणे, पाणी शुद्ध करणे, कुलिंग, धुतलेले कपडे वाळविणे, सौर ऊर्जेवर पाणी तापविणे,
- वीजनिर्मिती करणे, सूर्यचूल (अन्नपदार्थ शिजविण्यासाठी सौरकुकर)
- २) सौर फोटोव्होल्टॉईक (Solar Photovoltaic) तंत्रज्ञानामार्फत सूर्याच्या उष्णतेचे रूपांतर वीजेमध्ये केले जाते. ही सौर वीज अंधारात उजेडासाठी, प्रकाशासाठी, दळणवळणासाठी, गणकयंत्र, रेल्वे सिग्नल, वाहतुकीत वाहनांना गती देण्यासाठी, फ्रीजमध्ये, दूरदर्शन प्रसारणासाठी, रेडिओ व विजेण्यासाठी (बॅटरी) केला जातो.
- सौरऊर्जा ही पुनःनिर्मित ऊर्जा असल्याने या उर्जेमुळे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या पारंपरिक ऊर्जासाधनांची बचत होते.
- सौर ऊर्जा ही न संपणारी ऊर्जा असून प्रदूषणविरहित ऊर्जा आहे.
- सौर ऊर्जेचा इतर ऊर्जा साधनापेक्षा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ही ऊर्जा ऊर्जामुक्त व मुबलक प्रमाणात मिळते.
- सौर ऊर्जेची प्रमुख समस्या म्हणजे ही ऊर्जा रात्री व ढगाळ स्थितीत उपलब्ध होत नाही, त्यासाठी सौरऊर्जेचा साठा करावा लागतो.
- खापर्डी (नाशिक) येथे महाराष्ट्रातील एकमेव सौरऊर्जा प्रकल्प आहे.
- शिर्डी (अहमदनगर) येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरकुकरचा वापर करून अन्न शिजवले जाते. देशातील सर्वात मोठा महासौर ऊर्जा प्रकल्प शिवाजीनगर (धुळे) येथे स्थापन होत आहे.
- महाराष्ट्रात सौरऊर्जेबाबत औरंगाबाद जिल्हा अग्रेसर आहे.
- भारतात दरवर्षी ५०० ट्रिलिऑन किलोवॅट सौरऊर्जा मिळते.
- राजस्थानमध्ये वर्षभर आकाश स्वच्छ असते, त्यामुळे या राज्यात सौरऊर्जेच्या विकासाला अधिक वाव आहे.
- इमारतीच्या गच्चीवर (टेरेस) यंत्रणा बसवून त्यावर विद्युत उपकरणे चालवून पारंपरिक विजेची बचत करणे व ग्रामीण भागात डिझेलला पर्याय देणे ही सौर फोटो व्होल्टाईक ऊर्जा कार्यक्रमाचे उद्देश आहेत.
- देशातील सौर ऊर्जा केंद्रे
- राज्य सौर ऊर्जा केंद्र
- राज्य पश्चिम बंगाल - सागरबेट, कोलकाता
- मध्यप्रदेश - देवास
- दिल्ली - दिल्ली
- महाराष्ट्र - वलव्हण
- हरियाणा - गुडगाव
- उत्तरप्रदेश - कल्याणपूर, सराईसदी
- आंध्रप्रदेश - सलोनी पल्ली
- गुजरात - मधपार
- राजस्थान - मथानिया
- तामिळनाडू - कोईमतूर, नेलूरपलायम, एस.जी.पलायम, एस.एन. पलायम
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान १९ नोव्हे. २००९ रोजी जाहीर करून त्याची अंमलबजावणी ११ जाने. २०१० पासून सुरू आहे. या योजनेत २०२२ पर्यंत २०,००० मेगावॅट सौरवीज निर्मितीचे निर्धारित केले आहे.
- जाने.२०१२ साली भारतात सौर ऊर्जेपासून ४८१.४८ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता प्राप्त केली आहे.
- सागरी (लाटांची) ऊर्जा
- सागरी लाटांची ऊर्जा म्हणजे समुद्राच्या पाण्यात साठलेल्या वाऱ्याची यांत्रिक ऊर्जा होय.
- सागरी लाटा आणि समुद्रातील पाण्यातील तापमानाचा फरक यांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळवता येते.
- समुद्राच्या पाण्याचा पृष्ठभाग व १००० मीटर वा अधिक खोलीवरील पाणी यांच्या तापमानातील फरकाचा वापर करून टर्बाईन्सद्वारे वीजनिर्मिती करता येते. या तंत्रज्ञानास OTEC (Ocean Thermal Energy Conversion) म्हणतात.
- OTEC वर आधारित जगातील पहिला १०० मेगावॅट प्रकल्प तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ उभारण्यात येत आहे.
- भरती-ओहोटीच्या वेळी निर्माण होणाऱ्या लाटांमधील प्रंचड शक्तीद्वारे यंत्रातील पंखे फिरते ठेवून ऊर्जानिर्मिती केली जाते. या पद्धतीत भरतीच्या वेळी खाडीत चढलेले पाणी अडवून ऊर्जानिर्मिती केली जाते.
- बुधल ता.गुहागर, जि. रत्नागिरी येथे समुद्रलाटापासून ऊर्जानिर्मिती केली जाते.
- महाराष्ट्राच्या पश्चिम किणाऱ्यावर सागरी ऊर्जानिर्मितीस अनुकूल परिस्थिती आहे.
- सागरी लाटा ऊर्जा निर्मिती केंद्रामुळे पाण्यावरील पक्ष्यांची राहण्याची ठिकाणे उद्ध्वस्त होतात, त्या भागातील मच्छिमारीवरही प्रतिकूल परिणाम होतो.
- भू-औष्णिक ऊर्जा
- भू-गर्भातील प्रचंड उष्णतेचा वापर करून ऊर्जा मिळवता येते, या ऊर्जेस भू-औष्णिक ऊर्जा म्हणतात.
- वज्रेश्वरी (ठाणे) येथे उष्ण पाण्याचे झरे आहेत. तेथे पाणी उकळलेल्या अवस्थेत असते. जमिनीत अशा धगधगत्या जागी छिद्र (विधंन) करून भू-गर्भातील उष्णतेच्या साहाय्याने भू-पृष्ठावर वीजनिर्मिती केली
- कोकणातील गरम पाण्याचा झर्यांचा प्रदेश भू-औष्णिक ऊर्जानिर्मितीस पोषक आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा तांत्रिकदृष्ट्या खर्चाचा व गुंतागुंतीचा असल्यामुळे त्यास पुरेशी गती आलेली नाही.
- हैदराबाद येथे भू-औष्णिक ऊर्जा संशोधन व तंत्रज्ञानासाठी NGRI (National Geophysical Research Institute) स्थापन केली आहे.
- बायोमास ऊर्जा
- जंगलातून मिळणारे लाकूड, पालापाचोळा, झाडाझुडपांचे अवशेष, उसाची खोडे, शेतातील पीक तोडणीनंतरचा कचरा यांच्या ज्वलनातून वीजनिर्मिती करतात.
- उर्जासंपत्तीचे संवर्धन
- ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे.
- पारंपरिक ऊर्जासाधनाचा वापर कमी करून अपारंपरिक ऊर्जा साधनाचा वापर वाढविला पाहिजे. उदा.पवन ऊर्जा, सौरऊर्जा, भरती-ओहोटी ऊर्जा.
- गोबरगॅसचा प्रसार वाढल्यास इंधनासाठी वृक्षतोड होणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढल्यास पेट्रोल - डिझेलची बचत होईल.
- लोकसंख्या वाढीस आळा घातल्यास अप्रत्यक्षपणे ऊर्जासंपत्तीच्या संवर्धनास मदत होईल. औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाद्वारे ऊर्जासंवर्धनाचे लोकांना महत्त्व पटवून देणे.
संकीर्ण
- पवनऊर्जा, सौरऊर्जा, जैविक ऊर्जा, बायोगॅस, समुद्रलाटा, भू-औष्णिक ऊर्जा हे अक्षय उर्जेचे स्रोत आहेत.
- दगडी कोळसा, खनिजतेल व नैसर्गिक वायू ही ऊर्जासाधने क्षय (संपणारी) होणारी आहेत.
- ज्वलन झाल्यास त्याचे नूतनीकरण करणे अशक्य आहे.
- अणुइंधने ही असेंद्रिय स्वरूपाची असून त्यापासून उष्णता निर्माण केल्यानंतर ती संपुष्टात येतात.
- वनस्पती व प्राण्यांच्या टाकाऊ पदार्थापासून जैविक ऊर्जा निर्माण केली जाते.
- गोबरगॅस म्हणजे केरकचरा, शेण, मलमूत्र यावर सूक्ष्मजंतू प्रक्रिया करून मुक्त होणारा मिथेन वायू इंधन म्हणून वापरतात. गोबरगॅस वापराचे तंत्र प्रदूषणविरहीत आहे.
- महाराष्ट्रात रामपाडी येथे सौरऊर्जा केंद्र आहे.
- दगडी कोळशाला उद्योगधंद्याची जननी म्हणतात.
- दगडी कोळसा जलजन्य खडकाचा प्रकार आहे.
- खानदेशातील फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जळगाव जिल्ह्यात आहे.
- मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्र बीड जिल्ह्यात आहे.
- पश्चिम विदर्भातील पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे.
- पश्चिम महाराष्ट्रातील एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र कोराडी (नागपूर) येथे आहे.
- महाराष्ट्रात प्रामुख्याने सर्वात जास्त औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो.
- जायकवाडी-पैठण जलविद्युत प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळाली आहे.
- कोयना जलविद्युत प्रकल्प भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो.
- महाराष्ट्रातील खोपोली येथे पहिले जलविद्युत केंद्र आहे.
- कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे.
- कृष्णक्रांती खनिज तेल उत्पादनाशी संबंधित आहे.
- दाभोळ वीज प्रकल्पाला कतार व ऑस्ट्रेलिया हे दोन देश नैसर्गिक वायूचा पुरवठा करतात. मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा १९७३ साली सापडला.
- भारतात नैसर्गिक वायू सर्वात अधिक मुंबईहाय येथे मिळतो.
- मणिकरण येथे भू-औष्णिक विद्युत केंद्र आहे.
- राज्यसरकार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाद्वारे अक्षय ऊर्जा कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार करते.
- महाराष्ट्र ऊर्जाविकास अभिकरणाने (मेडा) १९८५ मध्ये देवगडच्या किनाऱ्यावर पवनऊर्जेचा प्रयोग केला.
- भारतात सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस १९८३-८४ पासून पवनऊर्जा कार्यक्रम सुरू केला.
- सौरशहर कार्यक्रमातंर्गत नागपूर शहर आदर्श सौर शहर म्हणून विकसित करण्यात येत आहे.
- सन २००४ पासून राजीव गांधी अक्षय ऊर्जादिन २० ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
- पुणे महानगरपालिकेने देशातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.
- अक्षय उर्जेच्या विकासासाठी केंद्र सरकारने ११ जाने २०१० रोजी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उर्जा मिशन सुरू केले आहे.
- ऊर्जा संवर्धन कायदा २००१ नुसार राज्य सरकारने ऊर्जा संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) संस्थेची नियुक्ती केली आहे.
- पवनचक्कीसाठी वाऱ्याची योग्य वेगमर्यादा ८ ते २३ मी/सेंकद इतकी लागते. भारतात सरासरी वेग १० मी/सेकंद असून ज्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, तेथे वाऱ्याचा वेग जास्त आढळतो.
- ITER ( International Thermonuclear Experimental Reactor) हा प्रकल्प संपूर्ण विश्वाला भेडसावणाच्या ऊर्जा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरू झाला आहे. यामध्ये अमेरिका, गया. चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, युरोपीय संघातील देश सहभागी आहेत. हा प्रकल्प फ्रान्स देशात सुरू झाला आहे.
- पूर्व महाराष्ट्रात औष्णिक विद्युत केंद्र स्थापन झाली आहेत, कारण तेथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
- जलविद्युत महत्त्वाचे ऊर्जासाधन आहे, कारण त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. महाराष्ट्रात पश्चिम घाटात धरणांना अनुकूल स्थिती असल्यामुळे अनेक जलविद्युत केंद्रे आहेत.
- कोळशापेक्षा खनिजतेल अधिक उपयुक्त आहे, कारण खनिजतेल द्रव स्वरूपात असल्याने स्वस्तात वाहून नेता येते.
- ऊर्जासाधनाचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, कारण ऊर्जासाधने मर्यादित असून त्यांची मागणी सतत वाढत आहे.
महाराष्ट्र आकडेवारी 2008-09
- घरगुती विजेचा वापर करणारे पहिले पाच जिल्हे – ब्रहन्मूबई,ठाणे,पुणे,नागपूर,वर्धा.
- घरगुती विजेचा वापर करणारे शेवटचे पाच जिल्हे – नंदुरबार,हिंगोली,जालना,उस्मानाबाद,अहमदनगर
- घरगुती विजेचा दरडोई १०० ते १२० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग
- घरगुती विजेचा दरडोई ८० ते १०० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – चंद्रपूर,औरंगाबाद,अमरावती,नाशिक,अकोला,कोल्हापूर.
- घरगुती विजेचा दरडोई ६० ते ८० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – जळगाव,गडचिरोली,भंडारा- 70,धुळे,सांगली,यवतमाळ- 66
- घरगुती विजेचा दरडोई ४० ते ६० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – उर्वरित सर्व जिल्हे.
महाराष्ट्रात कृषी विजेचा दरडोई वापर.
- महाराष्ट्र 2008-09 अनुसार,कृषी विजेचा दरडोई सरासरी वापर ५०.१७ किलोवॅट तास आहे.
- कृषी विजेचा दरडोई वापर असणारे पहिले पाच जिल्हे – सांगली,सोलापूर,नाशिक,जळगाव,भंडारा.
- कृषी विजेचा दरडोई वापर असणारे शेवटचे पाच जिल्हे – ठाणे,रत्नागिरी,रायगड,सिधुदुर्ग,जालना
- कृषी विजेचा दरडोई ६० ते ८० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – औरंगाबाद,बुलढाणा,वाशिम,हिंगोली,वर्धा.
- कृषी विजेचा दरडोई ४० ते ६० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – अमरावती,धुळे,नंदुरबार,परभणी,पुणे,उस्मानाबाद,यवतमाळ.
- कृषी विजेचा दरडोई २० ते ४० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – बीड,नांदेड,अकोला,नागपूर,गोंदिया,गडचिरोली.
महाराष्ट्रात औद्योगिक विजेचा दरडोई वापर.
- महाराष्ट्रात 2008-09 अनुसार,औद्योगिक विजेचा दरडोई सरासरी वापर २६१.४२ किलोवॅट तास आहे.
- औद्योगिक विजेचा दरडोई वापर करणारे पहिले पाच जिल्हे – रायगड,ठाणे,पुणे,वर्धा,जालना.
- औद्योगिक विजेचा दरडोई वापर करणारे शेवटचे पाच जिल्हे – वाशिम,हिंगोली,सिंधुदुर्ग,नांदेड,बीड.
- औद्योगिक विजेचा दरडोई ३०० ते ४०० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – कोल्हापूर,औरंगाबाद,नागपूर,चंद्रपूर
- औद्योगिक विजेचा दरडोई १०० ते २०० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – बृहन्मुंबई,भंडारा,धुळे,जळगाव,सांगली,सोलापूर.
- महाराष्ट्र एकूण विजेचा दरडोई वापर –
- महाराष्ट्रात 2008-09 अनुसार एकूण विजेचा दरडोई सरासरी वापर ६६६.३५ किलोवॅट तास आहे.
- एकूण विजेचा दरडोई वापर असणारे पहिले पाच जिल्हे – बृहन्मुंबई,रायगड,ठाणे,पुणे,वर्धा.
- एकूण विजेचा दरडोई वापर असणारे शेवटचे पाच जिल्हे – बीड,हिंगोली,नांदेड,वाशिम,उस्मानाबाद.
- एकूण विजेचा दरडोई ५०१ ते ७०० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – नागपूर,कोल्हापूर,नाशिक,औरंगाबाद,चंद्रपूर.
- एकूण विजेचा दरडोई ३०१ ते ५०० किलोवॅट तास दरम्यान वापर असणारे जिल्हे – जालना,सांगली,रत्नागिरी,जळगाव,भंडारा,सोलापूर.
- अदानी पावर कंपनी – १९८० मेगावॉट क्षमतेचा ऊर्जाप्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे.
- जनगणना 2001 नुसार,महाराष्ट्रात ४१०९५ वस्ती असलेली गावे आहेत ज्यापैकी ३६०१० गावांचे विद्युतीकरण हे ग्रामीण विद्युतीकरण धोरण 2004 च्या निकषांनुसार झाले आहे.
- 2008-09 साली १.१४ लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.
- वीज नियामक आयोग अधिनियम,१९९८ अंतर्गत तरतुदीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची स्थापना केली आहे. हे आयोग वीज दर ठरविण्याचे काम करते.
- औद्योगिक घटकाने प्रामुख्याने स्वतःच्या वापरासाठी वीजनिर्मितीकरिता उभारलेल्या विद्युत संचास बंदिस्त वीजनिर्मिती संच असे म्हणतात.
- सप्टेंबर 2008 मध्ये भारत व फ्रान्स या देशांनी द्विपक्षी करार केला,ज्यानुसार अणुशक्तीजन्य ऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याचे मान्य करण्यात आले.
- फेब्रुवारी 2009 मध्ये अणुशक्ती मंडळ व अरेवा कंपनी,फ्रान्सने सामंजस्य करार केले.
- महाराष्ट्रात 2008-09 मध्ये २४९८ दशलक्ष मेगावॉट तर 2009-10 मध्ये नोव्हेंबर 2009 पर्यंत २६०१ मेगावॉट ऊर्जानिर्मिती झाली.
- अक्षय ऊर्जानिर्मितीमध्ये देशात तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
- डिसेंबर 2004 मध्ये वीज विक्री कायदा,१९६३ मध्ये सुधारणा करून १५ मे २००८ रोजी हरित ऊर्जा कर लावण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली.त्यानुसार वाणिज्य आणि औद्योगिक कारणासाठी वीज वापरणाऱ्यांना 8 पैसे प्रति युनिट हरित ऊर्जा कर आकारण्यात येईल.
- प्रस्तावित निधीची व्यवस्था करण्याकरिता भारतीय विश्वस्त कायदा १८८२ नुसार उर्जंकर निधी ट्रस्ट नावाने सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करण्यात आला.
- ४ सप्टेंबर २००८ रोजी मंत्रिमंडळाने सर्वसमावेशक अपारंपरिक ऊर्जा धोरणास मान्यता दिली.यानुसार 2000 मेगावॉट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प,1000 मेगावॉट क्षमतेच्या उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्प,४०० मेगावॉट क्षमतेच जैविक अवशेषापासून वीजनिर्मिती प्रकल्प व १०० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम – कोळसा,चुनखडी,अशुद्ध लोह,बॉक्साईट.