भिन्न मतप्रणाली (DIFFERENT VIEWS ON THE INTERNAL STRUCTURE OF THE EARTH) -
प्रस्तावना -
भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंतचे अंतर ६३७१ कि.मी. हे विचारात घेतल्यास मानवाचे पृथ्वीच्या अंतरंगातील निरीक्षण अत्यंत तोकडे आहे. तरीही काही निष्कर्ष पुढीलप्रमाणे:
(१) पृथ्वीचा गोल कठीण पोलादी गोळयासारखा आहे.
(२) पृथ्वीच्या अंतर्गत भागात द्रवरूप पट्टा असून अनुकूल परिस्थितीत तो भूपृष्ठाकडे वाहू लागतो.
(३) पृथ्वीच्या अंतर्गत भागातील दाब काही कारणांमुळे कमी झाल्यास अंतरंगातील घनपदार्थ वितळून शिलारस तयार होतो. ज्वालामुखीच्या रूपाने तो भूपृष्ठावर येतो.
पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधी काही पुरावे (VARIOUS EVIDENCES REGARDING THE INTERNAL STRUCTURE OF THE EARTH) -
घनता :
पृथ्वीची घनता व त्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भात भूशास्त्रज्ञांची मते:
(i) के. ई. बुलेन(ii) स्वेस :
या शास्त्रज्ञाने घनतेच्या आधारे गाभा, मध्यावरण व बाहयावरण असे पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन विभाग अभ्यासले आहेत.
तापमान :
भूपृष्ठापासून जसजसे खोल जावे तसतसे दर ३२ मीटर खोलीला १० सें.ग्रे. याप्रमाणे तापमान वाढत जाते.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस अंतरंगात सुमारे ५० कि.मी. खोलीवर निर्माण होत असतो. त्या ठिकाणी १५००° सें.ग्रे.च्या जवळपास तापमान असते.
पृथ्वीच्या अंतरंगात तापमान वाढण्याची दोन महत्त्वपूर्ण कारणे:
भूकंप लहरी व पृथ्वीचे अंतरंग :
भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत अचूक माहिती उपलब्ध होते. भूकंप लहरी तीन प्रकारच्या असतात.
भूकंप लहरींच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, कमी घनतेच्या थरातून जास्त घनतेच्या घरात जाताना त्यांचा वेग वाढतो.
(अ) प्राथमिक लहरी किंवा अनुतरंग ('P' लहरी) (Primary Waves) :
(ब) दुय्यम लहरी किंवा अवतरंग ('' S लहरी) (Secondary Waves) :
(क) भूपृष्ठ लहरी किंवा पृष्ठतरंग ( लहरी) ( (L waves)/ Surface Waves) :
रिश्टर स्केल (Richter Scale) : अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चाल्र्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्याने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.
भूकंपलहरी : ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठ्या प्रमाणात हालचाली होतात व मोठ्या प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच ‘भूकंपलहरी’ असे म्हणतात.
नाभी(Focus) : भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.
अधीकेंद्र (Epicentre) : नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो बिंदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंपलहरींचा सर्वांत अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.
भूकंप अधिलेख (Seismogram) : भूकंपलहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंपलहरींचे तीन प्रकार पडतात : प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.
भूकंपाचे जागतिक वितरण
- अॅसिड लाव्हा : ज्या लाव्ह्यात सिलिकाचे प्रमाण ७० टक्के किंवात्यापेक्षाही जास्त असते, त्याला अॅसिड लाव्हा असे म्हणतात. हा लाव्हारस अत्यंत घट्ट व रंगाने पिवळसर असतो.
- बेसिक लाव्हा : या लाव्हारसात सिलिकेचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. बेसिक लाव्हा काळसर असून तो जास्त प्रभावी असतो.
ज्वालामुखीचे वर्गीकरण
ज्वालामुखीचे वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या विशिष्ट केंद्रानुसार पुढील प्रकार पडतात :
पृथ्वीचे तापमान
| खोली (किमी) | तापमान (से.) |
|---|---|
| ३० | ५०० |
| २०० | १४०० |
| १००० | १७०० |
| ३००० | २३०० |
| ६००० | २५००० |
पृथ्वीच्या अंतरंगातील दाब
| खोली (किमी) | वातावरण दाब |
|---|---|
| समुद्रसपाटी | १ |
| २५०० | १० लाख |
| ३५०० | २० लाख |
| ६३७१ | ३५ लाख |
पृथ्वीची घनता
संपूर्ण पृथ्वीची सरासरी घनता ५.५ घ.से.मी आहे
| खोली (किमी) | घनता (घ.से.मी.) |
|---|---|
| ३०-४० | २.७-३.३ |
| ४०-७०० | ३.३-४.३ |
| ७००-२९०० | ४.३-५.५ |
| २९००-५१५० | १०-१२ |
| ५१५०-६३७१ | १३.३-१३.६ |
पृथ्वीच्या अंतरंगाचे थर (INTERNAL LAYERS OF EARTH) -
१. शिलावरण किंवा कवच (Lithosphere or Crust)
शिलावरणाचे 'सियाल' व 'सिमा/सायमा ' असे दोन थर आहेत.
(अ) सियाल (Sial) :
भूपटलाच्या सर्वात वरच्या घन थरास 'सियाल' असे म्हणतात.
या थराची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत :
मूलद्रव्ये :
भूखंडे प्रामुख्याने सियालची बनलेली आहेत. म्हणजे सिलिका व AI म्हणजे अॅल्युमिनिअम, या दोन प्रमुख रासायनिक मूलद्रव्यांनी 'सियाल' हा थर बनलेला आहे.
खडक :
ग्रॅनाइटसारख्या अधिसिलिक (Acid) व अवसादी (जलजन्य) खडकापासून सियाल बनलेला असून काही ठिकाणी बेसाल्ट खडकदेखील आढळतो.
जाडी :
भूखंडाखाली सियाल थराची जाडी २९ कि.मी. असावी.
घनता :
सियालची घनता २.६५ ते २.७७ एवढी आहे.
भूकंप लहरींचा वेग :
प्राथमिक लहरी या थरातून सेकंदाला ५.६ कि.मी. वेगाने; तर (घनरुप) दुय्यम लहरी दर सेकंदाला ३.२ कि.मी. वेगाने सियाल थरातून प्रवास करतात.
(ब) कॉनरॅड विलगता (खंडत्व) (Conrad Discontinuity) :
सियाल व सिमा यांची ज्या भागात घनता बदलते; त्यास 'कॉनरॅड विलगता (खंडत्व)' असे म्हणतात. हा विभाग ठिकठिकाणी वेगळवेगळया खोलीवर आहे.
(क) सिमा / सायमा (Sima) :
सियाल थराच्या खालील थरास 'सिमा' असे म्हणतात.
या थराची वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.
मूलद्रव्ये :
सामान्यत: महासागरतळ सिमाचे बनलेले आहे.
Si म्हणजे सिलिका व Ma म्हणजे मॅग्नेशिअम या दोन मूलद्रव्यांनी सीमा थर बनलेला आहे.
खडक :
सिमा थरात बेसॉल्ट खडक आढळतात. हा मध्य सिलिका व अल्प सिलिका सायनाइट ते गॅब्रो खडकांनी बनलेला आहे.
जाडी :
सिमा थराची जाडी महासागराखाली ३ ते ५ कि.मी.; तर भूखंडाखाली १३ कि.मी. आहे. म्हणजे शिलावरणाचा थर ४२ कि.मी. चा (सियाल २९ कि.मी. व सिमा १३ कि.मी. मिळून) आहे.
घनता :
सिमाची घनता २.८५ ते ३.३ ग्रॅम/घन सें. मी. आहे. सियाल थराचे सिमा थरावर तरंगणे: सामान्यत: सियालची भूखंडे सिमाच्या अधिक घनतेच्या सागरतळावर तरंगत आहेत.
भूकंप लहरींचा वेग :
सिमा थरात भूकंपाच्या प्राथमिक लहरी दर सेकंदाला ६ ते ७.२ कि.मी. वेगाने; तर दुय्यम लहरी वर सेकंदाला ३ ते ४ कि.मी. वेगाने प्रवास करतात.
पृथ्वीचे अंतरंग -
शिलावरण - (अ) सियाल (ब) कॉनरॅड विलगता (खंडत्व) (क) सिमा
प्रावरण - (अ) मोहो विलगता (खंडत्व) (ब) बाहय प्रावरण (क) आंतप्रावरण
गाभा - (अ) गटेनबर्ग विलगता (खंडत्व) (ब) बाहय गाभा (क) अंतर्गाभा
२. प्रावरण किंवा मध्यावरण (Mantle) -
शिलावरणाच्या खालील थरास 'प्रावरण' असे म्हणतात,
जाडी :
प्रावरणाची जाडी सुमारे २८६५ कि.मी. असून याचा खोलीनुसार विस्तार ३३ कि. मी. ते २९०० कि. मी. पर्यंत आहे.
घनता :
प्रावरणाच्या वरील भागातील घनता ३.१ व आतील भागातील घनता ५.५७ ग्रॅम/घन सें.मी. इतकी आहे.
खनिज द्रव्ये:
खनिजात्मकदृष्टया हा भाग ऑलिव्हीन पायरॉक्सीनने युक्त असलेल्या एक्लोगाईटसारख्या पदार्थांनी बनलेला आहे.
पदार्थाची अवस्था :
या थरातील पदार्थाची मूळ अवस्था घन असून खोल भागात द्रायु (Fluid) अवस्थेतील गुणधर्म आढळतात.
क्षेत्रफळ व वस्तुमान :
पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी प्रावरणाने ८३% भाग व्यापलेला आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी प्रावरणाचे वस्तुमान ६८% आहे.
पृथ्वीचे अंतरंग प्रावरणाचे प्रमुख थर पुढीलप्रमाणे आहेत:
(अ) मोहो विलगता (खंडत्व) (Moho Discontinuity) :
(ब) बाह्य प्रावरण :
याचा विस्तार अंतरंगात ४२ ते ७०० कि.मी. खोलीवर आढळतो.
खनिज द्रव्ये : बाहय प्रावरणात ऑलिव्हिन ६०% ते ७०% व पायरॉक्सिन १५ ते २०% पर्यंत असते. हेच प्रमाण उल्काच्या बाह्य भागात आहे.
मंदगामी तरंगाचे शंकू: प्रावरणाच्या वरील थरास 'मंदगामी तरंगाचे शंकू' (Low Velocity Cone) असे म्हणतात, कारण या थरात पृष्ठभागापासून साधारण १०० ते २०० कि.मी. खोलीपर्यंत भूकंप लहरींचा वेग एकदम कमी होतो. कवच विरूपण (Crustal Cleforwalron) व ज्वालामुखीय प्रक्रिया घडून येण्यास हेच आवरण कारणीभूत असावे असे मानले जाते.
वैशिष्टये -
(क) आंतप्रावरण :
पृथ्वीच्या अंतरंगात ७०० ते २९०० कि.मी. आंतप्रावरण आढळते. आंतावरणामध्ये अधिक घनतेची सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड्स आहेत. अशाच प्रकारची द्रव्ये उल्काच्या अंतर्भागात आहेत.
३. गाभा (Core) -
अंतरंगात २८९० कि.मी. ते ६३७१ कि.मी. पर्यंत म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या पृथ्वीच्या अंतरंगास 'गाभा' असे म्हणतात.
गाभ्याचे थर व इतर वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत :
गटेनबर्ग विलगता (खंडत्व) :
प्रावरण व गाभा यांच्या सीमावर्ती प्रदेशास 'गटेनबर्ग विलगता (खंडत्व) असे म्हणतात.
(१) गाभ्याचे थर : गाभ्याचे दोन थर आहेत
(अ) बाहय गाभा (Outer Core) व
(ब) आंतरिक गाभा (Inner Core)
(अ) बाहय गाभा:
अंतरंगात २८९० कि.मी. ते ५१५० कि.मी. पर्यंतच्या पृथ्वीच्या अंतरंगास 'बाहय गाभा' असे म्हणतात.
वैशिष्ट्ये:
द्रवरूप :
बाह्य गाभ्यातून दुय्यम भूकंपलहरी जाऊ शकत नसल्याने हा भाग द्रवरूप असावा असे मानले जाते.
घनता :
बाहय गाभ्याची घनता गटेनबर्ग विलगतेजवळ १० आहे; तर आंतरिक गाभ्याजवळ १२.३ ग्रॅम/घन सें.मी. आहे.
(ब) आंतरिक गाभा :
अंतरंगात ५१५० कि.मी. ते ६३७१ कि.मी. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या अंतरंगास 'आंतरिक गाभा' असे म्हणतात.
वैशिष्टये -
घन अवस्था :
गाभ्याच्या बाहय थराखालील आंतरिक गाभा अगदी केंद्रबिंदूपर्यंत घन अवस्थेत आहे, असे अनुमान काढण्यात आले आहे.
घनता:
आंतरिक गाभ्याची घनता १३.३ पासुन १३.६ ग्रॅम/धन सें.मी. पर्यंत वाढत जाते.
संक्रमण विभाग (Transition Zone) :
बाहय गाभा व आंतरिक गाभा यामध्ये ४५० कि.मी. जाडीचा जो थर आहे, त्यास 'संक्रमण विभाग' (Transition Zone) असे नाव आहे. बाहय गाभा द्रवरूप, तर आंतरिक गाभा घनरूप मानला जातो, यामुळे या संक्रमण विभागाला महत्त्व आहे.
(२) गाभ्यातील खनिज पदार्थ व त्यांचे स्वरूप :
हा भाग अतिशय कठीण अशा खनिज द्रव्यापासून तयार झालेला आहे. यात निकेल (Ni) व लोह (Fe) या धातूंचे मिश्रण असल्याने त्यास 'निफे' (Nife) असे म्हणतात. पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी व नंतर आकुंचन पावत असताना लोहसंयुगाचे रूपांतर धातूमध्ये व सिलिकेटचे रूपांतर सिलिकॉनमध्ये झालेले असावे, यामुळे बाहय भागात लोह-निकेल ८०% आणि सिलिकॉन २०% आहे.
(३) गाभ्याचे घनफळ, वस्तुमान व घनता :
पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी १६% घनफळ व एकूण वस्तुमानापैकी ३२% वस्तुमान गाभ्याचे आहे. गाभ्याची सरासरी घनता प्रावरणाच्या सरासरी घनतेपेक्षा दुप्पट आहे.
अंतरंगातील तापमान वद्धी :
नवीन माहितीप्रमाणे अंतर्गत भागात तापमान १०० मीटर खोलीवर ३० से. याप्रमाणे वाढत जाते. कवचाखाली ३० कि.मी. खोलीवर ५००° से., २०० कि. मी. खोलीवर प्रावरणात १४००° से., १००० कि.मी. खोलीवर १७००° से., गाभ्यात ३००० कि.मी. खोलीवर २३००° से. आणि भूकेंद्रालगत ६००० कि.मी. खोलीवर २५००० से. पेक्षा जास्त तापमान आढळते.
अंतरंगातील दाबवृद्धी:
अंतर्गत भागात खोलीनुसार दाब वाढत जातो. २५०० कि.मी. खोलीवर १० लाख वातावरणाच्या वजनाएवढा, ३५०० कि.मी. खोलीवर २० लाख वातावरणाच्या वजनाएवढा; तर पृथ्वीच्या केंद्राजवळ ३५ लाख वातावरणाच्या वजनाएवढा दाब आढळतो.
पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी निष्कर्ष -
(१) पृथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप :
पृथ्वीचे अंतरंग पूर्णत: घनरूप असते; तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणाच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती.
परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढला जातो.
(२) भूगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ कि.मी. :
भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोन करून लहरी वळतात.
१०३° ते १४३° प्रदेशात 'P' आणि ''लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला 'भूकंप छाया प्रदेश' (Earthquake Shadow Zone) असे म्हणतात. यावरून भूगर्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ कि.मी. आहे असे निश्चित झाले,
(३) बाहय गाभा द्रवरूप :
गाभ्याच्या बाह्य आवरणाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाहय भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.
(४) कठीण घन पदार्थाचा अंतर्गाभा :
अंतर्गाभ्यात 'P'लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घनपदार्थांचा अंतर्गाभा बनलेला असावा.
(५) अति कठीण व घन पदार्थाचे प्रावरण :
'P' व 'S' लहरींचा वेग प्रावरणातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात. यावरून प्रावरण हे कठीण व घन पदार्थापासून तयार झालेले आहे असे अनुमान काढता येते.
भूकंप लहरींच्या अभ्यासावरून अंतरंगाचे स्वरूप -
(१) घनरूप गाभा : १३०० कि.मी. त्रिज्या.
(२) बाहय गाभा द्रवरूप (विष्यंद) Viscous): १३०० कि.मी. ते ३४०० कि.मी.
(३) गटेनबर्ग विलगता (खंडत्व) : गाभा व प्रावरण दरम्यान.
(४) प्रावरण : कमी-जास्त घनतेचे घटक.
(५) मोहो विलगता (खंडत्व) : प्रावरण व शिलावरण (कवच) दरम्यान.
(६) सिमा व सियाल : सिमाच्या प्रदेशावर तरंगणारे सियालचे प्रदेश.
(७) कॉनरॅड विलगता : सियाल व सिमादरम्यान.
(८) शिलावरण (कवच) : प्रावरणाच्या मानाने ठिसूळ शिलावरण.
पृथ्वीच्या अंतरंगाची यांत्रिक उपविभागणी (MECHANICAL SUB-DIVISION)
पृथ्वीच्या अंतरंगाची यांत्रिक विभागणी पुढीलप्रमाणे आहे :
(१) शिलावरण (Lithosphere) :
(२) दुर्बलावरण (Asthenosphere) :
(३) मध्यावरण (Mesosphere) :
पृथ्वीच्या अंतरंगात दुर्बलावरणाच्या खाली असलेल्या संपूर्ण प्रावरणाच्या भागास 'मध्यावरण' असे म्हणतात.
(४) केंद्रावरण (Barysphere) :
पृथ्वीच्या गाभ्याला केंद्रावरण' (Core) असे म्हणतात. अर्थात, ही संज्ञा आता कमी प्रमाणात प्रचलित आहे.
विभिन्न शास्त्रज्ञांनी अभ्यासलेले पृथ्वीच्या अंतरंगाचे थर (Zoning of the Earth's Interior) -
पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञांनी केलेला असून त्यांपैकी काही शास्त्रज्ञांचा आपण येथे उल्लेख करणार आहोत.
(१) स्वेस (Suess) : स्वेस यांनी सर्वात प्रथम पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील तीन थर अभ्यासले:
(अ) सियाल (Sial) : सिलिकॉन व अॅल्युमिनिअमपासून बनलेला हलक्या पदार्थांचा सर्वात वरचा घर.
(ब) सिमा (Sima) : सिलिकॉन व मॅग्नेशिअमसारख्या जड वस्तुमानापासून बनलेला असून सागरतळ या प्रकारचे आहेत.
(क) निफे (Nife) : निकेल व लोहासारख्या अवजड पदार्थापासून बनलेला खालचा थर.
(२) वांडर ग्राक्ट (Vander Gracht) : जर्मन शास्त्रज्ञ वांडर ग्राक्ट यांनी पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे:
वांडर ग्राक्ट यांच्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाची रचना आवरण -
घनता आणि विस्तार -
१. बाह्य सियाल आवरण - २.७५ ते २.९० घनता आणि ६० कि.मी. पर्यंत विस्तार
२. सिलिकेट आंतरावरण सिमा - ३.१ ते ४.७५ घनता आणि ६० ते ११४० कि.मी. विस्तार
३. धातू व सिलिकेटचे मिश्रावरण - ४.७५ ते ५.०० घनता आणि ११४० ते २९०० कि.मी. विस्तार
४. धातुप्रधान अंतर्भाग - ११.०० घनता आणि २९०० ते ६३७८ कि.मी. पर्यंत घनता
(३) लिंक-गटेनबर्ग (Link-Gatenberg) : अंतरंगाचे चार पर मानलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
पृथ्वीच्या अंतरंगाची लिंक-गटेनबर्गनुसार रचना –
| आवरण | सापेक्ष घनता | खोली | मूलद्रव्ये |
| बाह्य सियाल थर | २.७५ ते २.९० | 1.भूखंडाखाली ६० कि. मी. 2.अटलांटिक महासागराखाली २९ कि. मी. 3.पॅसिफिक महासागराखाली नगण्य खोली. | मुख्यत: सिलिकॉन व अॅल्युमिनिअम, इतर - ऑक्सिजन, पोटॅशिअम, लोह,मॅग्नेशिअम. |
| आंतरिक सियाल तळाकडील बाजू (सिमा) | ३. १ ते ४. ७५ | ६० ते १२०० कि.मी. | मुख्यत: सिलिकॉन व मॅग्नेशिअम. इतर - ऑक्सिजन, लोह, कॅल्शिअम, अॅल्युमिनिअम, पोटॅशिअम, सोडियम |
| मिश्र थर पॅलासाईट (Pallassite) | ४. ७५ ते ५ | १२०० ते २९०० कि. मी. | ऑक्सिजन सिलिकॉन, मॅग्नेशिअम आणि निकेल व लोहाचे घन मिश्रण. |
| गाभा (केंद्रक) (Nucleus) | ७.८ ते ११ | २९०० ते ३६७८ कि. मी. | निकेल-लोह |
(४) एच. जेफ्रीज् (Horold Jeffreys) : यांनी अंतरंगाचे चार थर मानलेले आहेत.
(अ) बाहय थर (Outer Layer) : सामान्यत: स्तरित खडकापासून थर.
(ब) द्वितीय थर (Second Layer) : ग्रॅनाईट खडकापासून थर.
(क) तृतीय थर (Third Layer) : थचिलाईट (Thachylyte) व डायोराईट (Diorite) खडकांपासून बनलेला थर.
(ड) नीचतम थर (Lowest Layer) :
ड्युनाईट (Dunite), पेरिडोलाईट (Peridolite), इक्लोगाईट (Eclogite) खडकांपासून बनलेला थर.
(५) ऑर्थर होम्स (Arthur Holmes) : यांनी अंतरंगाचे चार थर अभ्यासले आहेत.
(अ) स्तरित/अवसादी थर (Sedimentary Layer) : ०.९० कि.मी. खोली,
(ब) ग्रॅनाईट थर (Granite Layer) : १० ते १५ कि.मी. खोलीवरील थर.
(क) बेसॉल्टिक थर (Basaltic Layer) : २० ते ३० कि.मी. खोलीवरील थर.
(ड) निम्न थर (Lower Layer) : एकूण खोली २९०० कि.मी.
